• Home
  • माझा जिल्हा
  • राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार प्रा. हनुमंत माने यांना सन्मानपूर्वक प्रदान…
Image

राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार प्रा. हनुमंत माने यांना सन्मानपूर्वक प्रदान…

सोमेश्वरनगर…
साहित्यप्रेमी मंडळ सोमेश्वरनगर या साहित्य संस्थेचे अध्यक्ष व प्रेरणादायी प्रशिक्षक प्रा. हनुमंत माने यांनी संपादित केलेला “काव्यसंकल्प” राज्यस्तरीय प्रातिनिधीक कवितासंग्रहास “शब्दगंध” साहित्यिक परिषद व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या वतीने “राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार”
शब्दगंध साहित्य संमेलनाध्यक्ष-
डॉ. संजीवनी तडेगावकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.
याप्रसंगी स्वागताध्यक्ष-श्री.संपतदादा बारस्कर, आमदार संग्राम जगताप, पद्मश्री पोपटराव पवार, प्रसिद्ध साहित्यिक डॉ- संजय कळमकर, प्रा.डाॅ. संदीप सांगळे अध्यक्ष- मराठी अभ्यास मंडळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे,
श्री.संभाजीराव काकडे, श्री.विठ्ठलराव माने, श्री.आनंदराव चव्हाण, श्री.निखिल गायकवाड इ.
मान्यवर उपस्थित होते.
“काव्यसंकल्प” या कवितासंग्रहात संपूर्ण महाराष्ट्रातील निवडक बारा कवींच्या प्रत्येकी आठ कवितांचा समावेश करण्यात आला आहे.
हा कवितासंग्रह आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त स्नेहवर्धन प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेला आहे.
“काव्यसंकल्प” हा प्रातिनिधिक कवितासंग्रह “लोक माझे सांगाती” या राजकीय आत्मकथनाचे लेखक माननीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या अलौकिक कार्यकर्तृत्वाला सस्नेह अर्पण केलेला आहे.
या कवितासंग्रहाला
प्रा. डॉ. शिल्पागौरी गणपुले यांनी अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिली आहे.
प्रा. हनुमंत माने यांना
राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार सोळावे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन अहिल्यानगर येथे रविवार दिनांक ९ फेब्रुवारी २०२५ रोजी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
या पुरस्कार निवडीबद्दल सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री.पुरुषोत्तम जगताप, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष श्री.राजवर्धन शिंदे, बारामती औद्योगिक सेल चे अध्यक्ष श्री.राजेंद्र जगताप, श्री.रमाकांत गायकवाड, श्री.किरण आळंदीकर, श्री.सुनील भोसले,श्री.किशोर भोसले,श्री.विक्रम भोसले, श्री.ऋषिकेश गायकवाड इत्यादी मान्यवरांनी प्रा. हनुमंत माने यांचे अभिनंदन केले.

Releated Posts

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.

उपसंपादक- अक्षय थोरात  मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026