वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका युती करून लढविणार – राज कुमार साहेब

माझा जिल्हा

प्रतिनिधी

 सध्या होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व जागा आम्ही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रकाश आंबेडकर, तसेच प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकुर यांच्या आदेशाने पुणे जिल्ह्यात उमेदवा देणार आहोत परंतु स्थानिक लेवल वरती एखादा पक्ष वंचित बहुजन आघाडी सोबत युती करून निवडणुका लाढवु इच्छित असेल तर नक्कीच त्याची दखल घेवुन आदरणीय ॲड. प्रकाश आंबेडकर साहेब व प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकुर यांच्या सोबत चर्चा करून युती केली जाईल.

सध्या त्याची चाचणी सुरू आहे तसेच त्यांच्या मुलाखती घेऊन योग्य तो उमेदवार देऊन निवडणुकानां सामोरे जाण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, तसेच सध्या महागाई बेरोजगारी कारखानदारी अशा अनेक समस्या तसेच शेतकरी अशा अनेक समस्या या आम्ही जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढे घेऊन जाणार आहोत व हा आमचा निवडणुकीतील अजेंठा असेल, सध्या वंचित बहुजन आघाडी ने पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणाता पक्ष वाढवलेला असुन याचाच फायदा स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुकीत पक्षाला होणार आहे असे मत पुणे जिल्हा अध्यक्ष राज कुमार साहेब यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.