बारामती ! वडगाव निंबाळकर मधील सौ. मंदाकिनी ज्ञानेश्वर माने यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराणे सन्मानित.

Uncategorized

प्रतिनिधी –

नवक्रांती सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य, कमल नयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरअरिंग अँड टेकनोलॉजी बारामती व मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती येथे व संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त नीरा येथे वडगाव निंबाळकर मधील सौ मंदाकिनी ज्ञानेश्वर माने यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार देण्यात आला. यावेळी श्री. रविकुमार घोगरे, शर्मिलाताई नलावडे, श्री. धनंजय जमादार, डॉ. सुधीर लांडे, डॉ. सुधीर आटोळे ,श्री. चक्रपाणी चाचर या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला .

माने मॅडम या शैक्षणिक , सामाजिक , व राजकीय क्षेत्रात गेले 22 वर्ष कार्यरत आहेत. माने मॅडम यांना आजपर्यंत त्यांनी. मुली, महिला, अपंग, वृद्ध, परित्यक्ता. अनाथ मुले यांच्यासाठी खूप कामे केली आहेत. प्रत्येक कार्यामध्ये माने मॅडम यांचे सहकार्य सर्व महिला , मुली, व सामान्य नागरिकाला लाभले . याचप्रमाणे प्रत्येक कार्यामध्ये अग्रेसर असणारे माने मॅडम यांच्या कामाला पंचकृषीमध्ये वाव मिळत आहे . माने मॅडम ह्या इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण देत असतात . यातच कित्येक मुलांना त्यांनी स्कॉलरशिप बसउन दिली. या क्षेत्रांमध्ये काम करत असताना घरातील सर्व सदस्यांचा सिंहाचा वाटा मला लाभला असे माने मॅडम यांच्याकडून सांगण्यात आले .

माने मॅडम यांनी आपल्या कामाने समाजात एक प्रकारे त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमठविला आहे. सांगण्यासारखे खूप आहे त्यांच्या बद्दल पण थोडक्यात ही थोडी माहिती . आणि यामुळे त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे कारण खूप लोक काम करायचे म्हणून करतात पण माने मॅडम म्हणजे एक पारदर्शक उदाहरण आहे. की ज्या हे सामाजिक कार्य हातात घेऊन काहींना अंधारातून प्रकाशात घेऊन जातात.