• Home
  • माझा जिल्हा
  • एम न्यूज मराठी बातमी वरती शिक्का मोर्तब ,सोमेश्वर कारखाना कथित आर्थिक गैरव्यवहारा प्रकरणी कारखान्यातील संबंधीत विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निलंबन व तात्काळ गुन्हा दाखल करणार – श्री. पुरुषोत्तम जगताप
Image

एम न्यूज मराठी बातमी वरती शिक्का मोर्तब ,सोमेश्वर कारखाना कथित आर्थिक गैरव्यवहारा प्रकरणी कारखान्यातील संबंधीत विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निलंबन व तात्काळ गुन्हा दाखल करणार – श्री. पुरुषोत्तम जगताप

प्रतिनिधी

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यामध्ये रोजंदारी बेसिसवर काम करणाऱ्या कर्मचारी व कामगार यांचे हजेरी नोंदीमध्ये संगनमताने कारखाना प्रशासनाची फसवणूक करुन आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी कारखान्याचे लेबर व टाईम ऑफीस विभागातील लेबर ऑफीसर, हेड टाईम किपर, टाईम किपर, सर्व क्लार्क्स व कर्मचारी यांचे निलंबन करण्याचा निर्णय संचालक मंडळाने दि.२७/०२/२०२५ रोजी पार पडलेल्या कार्यकारी मंडळाच्या सभेमध्ये घेतला असून सोबतच या सर्वांविरोधात व लेबर पुरवठा करणाऱ्या कंत्राटदार यांचेवर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करणार असल्याची माहिती श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्री. पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.

श्री. जगताप यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे की, आपला श्री सोमेश्वर कारखाना सर्वच क्षेत्रामध्ये आघाडीवर असताना कारखान्याच्या कामकाजामध्ये चुकीचे काम करणाऱ्या कोणत्याच घटकाला पाठीशी घालू नये अशी कारखान्याचे मार्गदर्शक व राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय श्री अजितदादा पवार यांची संचालक मंडळास वेळोवेळी सुचना असते बस लयाअनुसरुनच संचालक मंडळ काम करण्याचा प्रयत्न देखिल करत असते. असे असताना जाणीवपुर्वक कारखान्याच्या प्रगतीमध्ये अडसर ठरेल व कारखान्याचे नुकसान होईल असे काही अधिकारी कामगार यांनी कामकाज केल्याचे निदर्शनास आल्याने या अधिकारी व कर्मचारी यांचे विरोधात तात्काळ कारवाई करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असून नियमानुसार कायदेशीर मुद्दे विचारात घेवून याप्रकरणाची इंडस्ट्रीयल व लेबर न्यायालयामध्ये काम पाहणाऱ्या तज्ञ वकिलांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करुन नियमाप्रमाणे सखोल तपास करण्याचा निर्णय देखिल संचालक मंडळाने घेतलेला आहे.

श्री. जगताप पुढे म्हणाले की, याप्रकरणाची गंभीरता लक्षात घेता सन २०१५ पासून आजअखेरपर्यंत रोजंदारी कर्मचाऱ्यांची हजेरी नोंद व प्रत्यक्ष दिलेला पगार, झालेले कामकाज इत्यादीची मान्यताप्राप्त सनदी लेखापालामार्फत ऑडीट करुन चौकशी करणेचा निर्णय देखिल घेणेत आलेला आहे. श्री. जगताप पुढे म्हणाले की, या प्रकरणामध्ये दोषी असणाऱ्या व्यक्तींवर कठोरपणे कारवाई करणेचा संचालक मंडळाने निर्णय घेतलेला असून यामध्ये कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही असे संचालक मंडळाच्या वतीने समस्त सभासद व शेतकरी यांना अश्वस्त करत आहोत.

Releated Posts

यंदा बारामतीचे प्रदर्शन आठ दिवस ! कृषक प्रदर्शन शनिवारपासून; ११ वर्षांची परंपरा जपली

प्रतिनिधी बारामती अँग्रीकल्चरल -डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राचे यंदाचे कृषिप्रदर्शन ‘कृषक ‘२०२६ चे आयोजन केले असून १७…

ByBymnewsmarathi Jan 12, 2026

सोमेश्वर अदा करणार विना कपात ऊस बिले. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप.

प्रतिनिधी शासन नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी) रु.३२८५/- प्र.मे.टन इतका निघत…

ByBymnewsmarathi Jan 9, 2026

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे येथे एस टी – दुचाकी अपघातात दोन तरुण ठार

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे दरम्यान हॉटेल मयुरी नजीक एस टी बस व दुचाकीच्या अपघातात दोन तरुणांना जीव गमवावा…

ByBymnewsmarathi Jan 4, 2026

मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा अभियान २०२५–२६ संपन्न

सोमेश्वरनगर :सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने “रस्ते सुरक्षा…

ByBymnewsmarathi Dec 23, 2025