संपादक मधुकर बनसोडे.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या लेबर ऑफिसर सह टाईम ऑफिस मधील कर्मचारी यांनी कथित आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी सोमेश्वर कारखान्याच्या चेअरमन संचालक मंडळाने त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करत तात्काळ कायदेशीर गुन्हे दाखल करू असे अस्वस्थ केले होते. मात्र अद्यापही गुन्हे दाखल न झाल्यामुळे सोमेश्वर चा ऊस उत्पादक सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त करीत आहे.
सूत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार लवकरच सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांचे शिष्टमंडळ राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन सभासदांच्या संस्थेत चोऱ्या करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवरती त्वरित गुन्हे दाखल करावेत अशा आशियाचे निवेदन देणार असल्याचे समजत आहे.
तसेच कारखान्याच्या सिव्हिल विभागांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचे सभासदांमधून बोलले जात आहे? यावरती देखील चेअरमन संचालक मंडळ काय भूमिका घेणार आहेत तेव्हा त्या विभागाची तपासणी करणार आहेत हे स्पष्ट करावे अशी मागणी सभासद वर्गांमधून होत आहे.
सोमेश्वर चा सभासद हा जागृत सभासद आहे त्यामुळे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील जे कोणी अधिकारी पदाधिकारी असतील त्यांच्यावरती त्वरित गुन्हे दाखल करावेत. अन्यथा सोमेश्वर कारखान्यावरती सभासद उपोषणाला बसणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून होत आहेत.