श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयात ८ मार्च ‘जागतिक महिला दिन’ साजरा

Uncategorized

प्रतिनिधी.
निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयात शनिवार दि. ८मार्च २०२५रोजी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.दिपाली ननावरे यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले व आपल्या प्रास्ताविकात प्राचीन काळापासूनच्या भारतातील कर्तबगार स्त्रियांच्या कार्याची ओळख करून दिली. व सर्व विद्यार्थ्यांनी स्त्री पुरुष समानता राखण्याचे आवाहन केले.
यावेळी भारतीया फाउंडेशन सी.एस.आर प्रमुख सायली फुंदे मॅडम यांनी पुरातन काळातील गोष्टींच्या माध्यमातून स्त्रियांचे महत्त्व स्पष्ट केले.
यावेळी विद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी महिला दिनाचे महत्त्व स्पष्ट करणारी मनोगत व्यक्त केली.
महिला दिनाच्या या कार्यक्रमानिमित्त विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी काही कर्तबगार स्त्रियांची व त्यांना साथ देणाऱ्या पुरुषांची वेशभूषा केलेली होती व या विद्यार्थ्यांनी आपल्या परिचयातून संबंधितांच्या कार्याचे स्मरण करून दिले.
या निमित्ताने कर्तबगार महिलांचे पोस्टर व त्यांच्या कार्याचा उल्लेख असणाऱ्या माहितीचे संकलन असणारे प्रदर्शन विद्यालयात भरवण्यात आले होते, या प्रदर्शनाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा,सौ. ज्योतीताई लकडे, सी एस आर प्रमुख सायली फुंदे, व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका व उपस्थित माता पालक यांच्या हस्ते झाले.मान्यवरांनी सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता ७वी तील कु.अनुष्का विटकर या विद्यार्थिनींनी केले व आभार इ. ८वी तील कु.अनुराधा ननावरे हिने मानले.
संस्थेचे अध्यक्ष मा .श्री.सतीशभैय्या काकडे दे. उपाध्यक्ष मा. श्री.भीमराव बनसोडे व मानद सचिव मा.श्री.मदनराव काकडे दे.यांनी जागतिक महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.