• Home
  • माझा जिल्हा
  • बारामती – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे केंद्र पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत असाक्षर व्यक्तींची परीक्षा संपन्न –
Image

बारामती – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे केंद्र पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत असाक्षर व्यक्तींची परीक्षा संपन्न –

प्रतिनिधी –

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे पायाभूत साक्षरता व संख्यादान चाचणी अंतर्गत शाळेमध्ये २१ असाक्षर व्यक्तींची परीक्षा पार पडली . सदर परीक्षेमध्ये मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव सस्ते यांनी केंद्र संचालक म्हणून काम पाहिले . त्याचबरोबर शाळेतील उपशिक्षिका सौ .मनीषा चव्हाण श्री विठ्ठल माध्यमिक विद्यालय कांबळेश्वर चे उपशिक्षक श्री दिलीप निंबाळकर, श्री संदीप शिंदे ,श्री जगताप सर ,श्री शिंदे सर यांनी पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली . सर्वाच्या उपस्थितीमध्ये नवभारत साक्षरत असाक्षर परीक्षा यशस्वीपणे पार पडली .

सदर परीक्षा शुभारंभा वेळी शाळेच्या वतीने असाक्षर परीक्षार्थीचे स्वागत गुलाबपुष्प देऊन करण्यात आले .प्रामुख्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे मागील वर्षी १६आणि चालू वर्षी २१ अशा ३७ असाक्षर व्यक्तींची आज अखेर परीक्षा झाली असून नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत नोंदणी उद्दिष्ट पूर्ण केले . असाक्षर नोंदणी ,टॅग करणे ,फार्म भरणे , डाटा नोंदणी, परीक्षा आयोजन आदी बाबतच्या राज्य शैक्षणिक संशोधन परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्गदर्शक सूचना नुसार पार पडले . प्राचीन पैसे महाराजचे पुणे यांचेकडील शासन स्तरावरील मार्गदर्शक सूचनानुसार असाक्षर उद्दिष्ट पूर्तता करण्याचे काम मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांच्या मदतीने पार पाडण्यात आले . असाक्षर व्यक्तींच्या प्रबोधनाची काम शाळेतील शिक्षक इयत्ता नववी मधील स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी अतिशय चोख पद्धतीने काम बजावले .

उल्हास नवभारत साक्षरता अंतर्गत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन अंतर्गत समाज प्रबोधन करणेसाठी गावातील भिंतीवरती मुळाक्षरे, पाढे, अंक यांचे चित्रमय लेखन गावात दर्शनी भागावर भिंतीवरती साक्षरतेचे उद्दिष्ट पूर्ततेसाठी प्रबोधनात्मक चित्रे , रंगरंगोटी करून उद्दिष्ट पूर्तीसाठी मागील वर्षापासूनच प्रयत्न केले असून २०२ ५ अखेर ३७ असाक्षरांचे उरिदष्ट पूर्तता केली आहे .

जिल्हा परिषद प्राथमिक कांबळेश्वर व श्री विठ्ठल माध्यमिक विद्यालय कांबळेश्वर येथील शिक्षकांनी अतिशय छान पद्धतीने नवभारत साक्षरता असाक्षर परीक्षा यशस्वी राबवून उदिदष्ट पूर्तता केलेबद्दल पंचायत समिती गटशिक्षण अधिकारी श्री निलेश गवळी साहेब केंद्रप्रमुख सौ .सफिया तांबोळी मॅडम यांनी कौतुक केले.

Releated Posts

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे येथे एस टी – दुचाकी अपघातात दोन तरुण ठार

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे दरम्यान हॉटेल मयुरी नजीक एस टी बस व दुचाकीच्या अपघातात दोन तरुणांना जीव गमवावा…

ByBymnewsmarathi Jan 4, 2026

मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा अभियान २०२५–२६ संपन्न

सोमेश्वरनगर :सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने “रस्ते सुरक्षा…

ByBymnewsmarathi Dec 23, 2025

बेपत्ता झालेल्या दोन युवकांचा शोध घेण्यात वडगाव निंबाळकर पोलिसांना यश.

प्रतिनिधी. वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 274/2025 BNS 137(2) मधील मुले 1) शुभम गणेश जाधव वय…

ByBymnewsmarathi Dec 20, 2025

मतमोजणी प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

प्रतिनिधी पुणे, दि.२०: राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यात १४ नगरपरिषदा व ३ नगरपंचायतीकरिता २ आणि २० डिसेंबर…

ByBymnewsmarathi Dec 20, 2025