प्रतिनिधी – फिरोज भालदार
मुस्लिम धर्माचा पवित्र महिना म्हणजे रमजान महिना ओळखला जातो यामध्ये सर्व मुस्लिम बांधव महिनाभर उपवास धरून नमाज पठण करत असतात . याचेच औचित्य साधून मदिना मस्जिद वडगाव निंबाळकर येथे वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन कडून इफ्तार पार्टी चे आयोजन करण्यात आले होते .
यावेळी वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक API सचिन काळे व याचबरोबर त्यांच्या स्टाफचे पोलीस हवालदार महेश पन्हाळे ,तोफीक मानेरी , ऋदयनाथ देवरकर , यांनी सर्व मुस्लिम बांधवांबरोबर रोजा इफ्तार केला. यावेळी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे API सचिन काळे यांच्याकडून सर्व मुस्लिम बांधव यांना रमजान महिन्याच्या शुभेच्छा देण्यात आले .
वडगाव निंबाळकर मुस्लिम बांधव या इफ्तार पार्टीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते . इफ्तार पार्टीचे सूत्रसंचालन शाहबुद्दिन मनेर सर यांनी केले तर आभार जहांगीर शेख यांनी मानले.