नींबूत छप्री येथील नवीन अंगणवाडी चे उद्घाटन समारंभ मान्यवरांच्या शुभहस्ते पार पडला.

Uncategorized

प्रतिनिधी.
पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जवळपास साडेचौदा लाख रुपये किमतीची अंगणवाडी नींबूत ग्रामपंचायत अंतर्गत निंबूत छप्री येथे. येथे उभारण्यात आली आहे या अंगणवाडीमध्ये जवळपास 45 विद्यार्थी शिकत आहेत.
पुणे जिल्हा परिषदेचे मा. बांधकाम व आरोग्य सभापती श्री प्रमोद काकडे यांनी नेहमीच विकासाकडे लक्ष देऊन गावच्या विकासामध्ये भर टाकण्याचे काम केले आहे. सुसज्ज इमारत बांधून दिल्यामुळे ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.
या उद्घाटन प्रसंगी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मा. अध्यक्ष श्री शहाजीराव काकडे, प्रमोद काकडे, ग्रामपंचायत निंबूचे उपसरपंच श्री अमरदीप काकडे, ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार काकडे, केंद्रप्रमुख दगडे सर, मुख्याध्यापक जाधव सर, खलाटे अण्णा, शाबुद्दीन सय्यद, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते