सोमेश्वर च्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील आरोपींवरती गुन्हा दाखल करण्याचा चेअरमन संचालक मंडळाला विसर पडला का?
1 min read

सोमेश्वर च्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील आरोपींवरती गुन्हा दाखल करण्याचा चेअरमन संचालक मंडळाला विसर पडला का?

संपादक मधुकर बनसोडे.

 लेबर ऑफिसर सह टाईम ऑफिस मधील कर्मचाऱ्यांच्या कडून सोमेश्वर कारखान्यामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचे चेअरमन संचालक मंडळाच्या प्राथमिक चौकशी दरम्यान निदर्शनास आले.

 त्यानंतर चेअरमन व संचालक मंडळ यांनी त्वरित मासिक मीटिंग घेऊन संबंधित विभागातील कर्मचारी अधिकारी यांच्या निलंबन केले व तातडीने दोशींवरती गुन्हे दाखल करू असे अश्वस्त केले होते मात्र. त्यानंतर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणांमध्ये नक्की किती घोटाळा झाला आहे हे तपासण्यासाठी कमिटीची स्थापना करण्यात आली? 30 मार्च पर्यंत कमिटीचा अहवाल कारखाना प्रशासनाकडे उपलब्ध होणार असल्याच्या चर्चा काही संचालकांमधून होत होत्या मात्र आज दोन एप्रिल उजेडला तरीदेखील संबंधितांवरती कायदेशीर गुन्हे दाखल केले नसल्याचे निदर्शनास येत आहे त्यामुळे सभासदांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे.

 संबंधित आरोपींवरती गुन्हे दाखल करण्याचा चेअरमन व संचालक मंडळ यांना विसर पडला आहे की काय? अशी चर्चा सभासदांमधून होत आहे.

 गुन्हे दाखल न करण्यासाठी कोणत्या नेत्याचा चेअरमन संचालक मंडळ यांच्यावर दबाव तर नाही ना? अशी देखील चर्चा सध्या सोमेश्वर परिसरामध्ये रंगू लागली आहे.

 सुरुवातीपासूनच हे प्रकरण दडपले जाईल अशा देखील काही सभासदांमधून चर्चा होत होत्या आता कुठेतरी त्या चर्चाच सत्यात उतरता येत काय अशी देखील भीती सभासदांच्या मनात येऊ लागली आहे.