• Home
  • माझा जिल्हा
  • बारामती ! क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले उत्सव समिती बारामती शहर व ग्रामीण आयोजित ‘ज्योती वाचन सप्ताह’ची सुरवात.  
Image

बारामती ! क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले उत्सव समिती बारामती शहर व ग्रामीण आयोजित ‘ज्योती वाचन सप्ताह’ची सुरवात.  

प्रतिनिधी –

महामानवांची जयंती साजरी करत असताना त्यांचे विचार समजून घेणे गरजेचे आहे . त्यासाठी त्यांनी लिहिलेले साहित्य व त्यांच्या जीवनावरती इतरांनी लिहिलेली पुस्तके वाचण्याचा संकल्प या ज्योती सप्ताह च्या पहिल्या दिवशी झाला. वाचन किती महत्त्वाचे आहे आणि ते का केले पाहिजे याचे योग्य मार्गदर्शन विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाचे प्राध्यापक मा. विजय काकडे सर यांनी केले. सर्वधर्म ग्रंथ व सर्व महापुरुषांची चरित्रे आजच्या पिढीने वाचली तर एक चांगली पिढी घडेल. आणि जातीधर्मातील वाद संपुष्टात येतील. समाजामध्ये फक्त दोनच जाती आहेत स्त्री आणि पुरुष.

 यावेळी जवळपास १५० महिला, पुरुष हजर होते.दि.१० एप्रिल २०२५ पर्यंत हा सप्ताह महात्मा फुले मंगल कार्यालय, पाटस रोड, बारामती येथे सुरू राहणार आहे.

कार्यक्रमाची प्रस्तावना सौ.वनिता बनकर यांनी केली,

क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले उत्सव समितीच्या सर्व सदस्यांच्या वतीने श्री.किशोर हिंगणे यांनी शुक्रवार दि. ११ एप्रिल २०२५ रोजी महात्मा फुले जयंतीनिमित्त जो मिरवणूक सोहळा होणार आहे त्या संदर्भात माहिती दिली ते म्हणाले हा कार्यक्रम डिजे विरहित (No DJ ) होणार असून यात पारंपारिक वाद्य लेझीम ढोल ,टाळ मृदंग यांचा समावेश असणार आहे. तसेच कार्यकर्ता हाच मान्यवर असणार आहे. इथे ना कोणी अध्यक्ष ना कोणी प्रमुख. या निर्णयाचे स्वागत अनेक सामाजिक स्तरातून होत आहे. इतर समाजाने देखील सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

 मंगलताई बोरावके यांनी आभार मानले. या कार्यक्रमात श्री गोडांबे यांनी निर्मिती केलेला आणि ११ एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित होणा-या ‘फुले’ या चित्रपटाच्या बोर्ड चे अनावरण करण्यात आले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ योगिता काळोखे यांनी केले.या कार्यक्रमाला समता पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीप फरांदे,तसेच किशोर हिंगणे ,शशांक झगडे ,प्रदीप लोणकर, बापू लोखंडे ,भानुदास हिंगणे, अमोल नेवसे, केतन गार्डी ,संदीप अभंग, सोपानराव बोरावके ,परशुराम गायकवाड ,उदय घनवट बाळासाहेब रेवडे ,हिरवे साहेब, कवले साहेब नितीन शेंडे ,कमलताई हिंगणे ,शोभा बनकर, विजया बनकर ,ज्योती लडकत, प्रज्ञा ढोले, सुनीता लिंगे ,वैशाली माळी आदी मान्यवर उपस्थित होते.

Releated Posts

यंदा बारामतीचे प्रदर्शन आठ दिवस ! कृषक प्रदर्शन शनिवारपासून; ११ वर्षांची परंपरा जपली

प्रतिनिधी बारामती अँग्रीकल्चरल -डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राचे यंदाचे कृषिप्रदर्शन ‘कृषक ‘२०२६ चे आयोजन केले असून १७…

ByBymnewsmarathi Jan 12, 2026

सोमेश्वर अदा करणार विना कपात ऊस बिले. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप.

प्रतिनिधी शासन नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी) रु.३२८५/- प्र.मे.टन इतका निघत…

ByBymnewsmarathi Jan 9, 2026

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे येथे एस टी – दुचाकी अपघातात दोन तरुण ठार

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे दरम्यान हॉटेल मयुरी नजीक एस टी बस व दुचाकीच्या अपघातात दोन तरुणांना जीव गमवावा…

ByBymnewsmarathi Jan 4, 2026

मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा अभियान २०२५–२६ संपन्न

सोमेश्वरनगर :सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने “रस्ते सुरक्षा…

ByBymnewsmarathi Dec 23, 2025