मुख्य मजकुरावर जा
Tuesday, 15 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 06 June 2025 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

येत्या खरीप हंगामात युरिया खतासोबतच अन्य खताचा वापर करण्याचे आवाहन

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
June 6, 2025 1 मिनिट वाचन 8,514 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी.

बारमती, दि.६: खरीप हंगाम २०२५-२६ मध्ये शेतकऱ्यांनी पिकासाठी केवळ युरिया खत जास्त प्रमाणात वापरण्याऐवजी कृषी विद्यापीठाच्या शिफारसीनुसार नत्र, स्फुरद, पालाश युक्त खतांचा वापर करावा असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.

युरिया खतासोबतच अन्य खताचा वापर केल्यास जेणेकरून पिकांना आवश्यकतेनुसार वाढीसाठी प्रमुख अन्नद्रव्यांचा योग्य प्रमाणात वापर होईल.
शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून आवश्यकतेनुसार खतांचा वापर करावा. माती परीक्षण केल्याने खतांच्या मात्रेचा योग्य वापर करता येईल त्यामुळे खतांच्या खर्चात बचत होईल व उत्पन्न वाढीस मदत होईल. रासायनिक खतांच्या अतिवापराने होणारे शेतीचे नुकसान टाळता येईल.

शेतकऱ्यांनी नेहमीच बियाणे, खते, औषधे खरेदी करताना विक्रेत्यांकडून पक्के बिल (एम फॉर्म) पावती घेऊन खरेदी करावी, असे आवाहन तालुका कृषि अधिकारी सचिन हाके यांनी केले आहे.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख