• Home
  • माझा जिल्हा
  • माळेगाव पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाकडुन जबरी चोरीचा गुन्हा उघड करीत दोन आरोपींना मुददेमालासह काही तासांतच अटक.
Image

माळेगाव पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाकडुन जबरी चोरीचा गुन्हा उघड करीत दोन आरोपींना मुददेमालासह काही तासांतच अटक.

प्रतिनिधी.

बारामती परीसरात चोरीचे प्रमाणे वाढले असल्याकारणाने मा. पोलीस अधिक्षक साो यांनी सदर गुन्हे उघड करणेकरीता व त्यावरती प्रतिबंध करणेकरीता गुन्हे पथकाला व पोलीस स्टेशनचे प्रभारी सचिन लोखंडे साो यांना सुचना दिल्या होत्या त्याप्रमाणे प्रभारी अधिकारी सचिन लोखंडे साहेब यांचे सुचनेप्रमाणे गुन्हे पथकाने व पोलीस स्टेशनचे इतर अंमलदारांनी पोलीस स्टेशनचे हदिदमध्ये गस्त वाढविली होती दरम्यान ता.०३/०६/२०२५ रोजी रात्रौ २१/०० वा चे दरम्यान फिर्यादी भिमराव रामचंद्र पिंगळे रा. पिगळेवस्ती शिरष्णे ता. बारामती जि.पुणे हे आपल्या मोटारसाकल वरती मौजे पाहुणेवाडी गावचे हदिदत फलटण बारामती रोडने घरी जात असताना दोन अनोळखी इसमांनी त्यांचे ताब्यातील मोटार सायकल आडवी मारून फिर्यादीस मारहान करून फिर्यादीचा विवो कंपनीचा मोबाईल व खिशातील रोख रक्कम १८,०००/- रू जबरीने चोरी करून चोरून नेले बाबत फिर्यादी यांनी पोलीस स्टेशन येथे कळवुन तशी फिर्याद दिली असता लागलीच तकार दाखल झालेबरोबरच माळेगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे यांनी गुन्हे पथकाला बोलावुन सदर जबरी चोरी उघड करणेबाबत मार्गदर्शन केले व तश्या सुचना दिल्या सदर गुन्हयातील फिर्यादी यांचेकडे विचारपुस केली असता दोन आरोपी गुन्हा करीत असताना आपापसात बातचीत करीत असताना त्यातील एका आरोपीने दुस-या आरोपीस अक्षय या नावाने बोलावले असलेबाबत फिर्यादी यांनी सांगितले त्याप्रमाणे स्वतः प्रभारी अधिकारी सचिन लोखंडे व गुन्हे पथकाने गुप्त माहीतीदारामार्फत माहिती काढून, तांत्रिक माहीतीचे आधारावर इसम नामे. १) अक्षय चंद्रकांत जाधव वय.२४ वर्षे रा. खांडज ता. बारामती जि.पुणे २) मनोज उर्फ बाबु शिवराज गालफाडे वय १९ वर्षे रा. बुरूडगल्ली पाहुणेवाडी ता. बारामती जि. पुणे यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे कसुन चौकशी केली असता त्यांनी सदर ची जबरी चोरी केल्याचे कबुल केले. त्यांच्याकडून चोरी केलेल्या मुददेमालापैकी १) विवो कंपनीचा मोबाईल व २)५,०००/- रोख रक्कम असा एकुण १८,०००/- रू किमतीचा मुददेमाल हस्तगत केला आहे. यातील फिर्यादी यांचे दिले फिर्यादी वरून माळेगाव पोलीस स्टेशन गु.र.न १४६/२०२५ बी.एन.एस क.३०९ (४), ३०९ (६) वगैरे कलमांतर्गत गुन्हा नोंद केला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक देविदास साळवे करीत आहेत.

सदरची कामगीरी मा. पोलीस अधिक्षक संदिपसिंग गिल साो, अप्पर पोलीस अधिक्षक गणेश बिराजदार, उपविभागिय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उप निरीक्षक देविदास साळवे, पो हवालदार. राहुल पांढरे, विजय वाघमोडे, अमोल राउत, ज्ञानेश्वर मोरे, नितीन कांबळे, जयसिंग कचरे, अमोल वाघमारे यांनी केली आहे.

Releated Posts

सोलापुरात संत गजानन महाराज आणि सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज यांच्या पालखी भेटीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

प्रतिनिधी सोलापुरात संत गजानन महाराज आणि सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज यांच्या पालखी भेटीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.…

ByBymnewsmarathi Jul 19, 2026

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026