सोमेश्वर परिसरामध्ये ऊसतोड मजुरांची लगबग सुरू

Uncategorized

. प्रतिनिधी.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम 2022/2023 चा हंगाम सुरू करण्यासाठी नगर, बीड, जालना, उस्मानाबाद, अशा अनेक ठिकाणाहून ऊसतोड मजूर सोमेश्वर परिसरांमध्ये दाखल होऊ लागले आहेत. ऊसतोड मजुरांनी राहुल यांच्या ठिकाणची स्वच्छता करून राहुटी उभे करण्याचे काम सुरू केलेले आहे. ऊसतोड मजुरांच्या येण्यामुळे सोमेश्वर व परिसरातील बाजारपेठेमध्ये नऊ चैतन्याचे वातावरण  ( उत्साही) पाहण्यास मिळत आहे. एकीकडे टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी आपलं गाव सोडून आलेल्या मजुरांना बैलांच्या चाऱ्याचा प्रश्न  भेडसावत आहे दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे कारखाना चालू होण्यासाठी विलंब होतोय की काय असा प्रश्न ऊसतोड मजुरांचा पुढे निर्माण झालेला आहे कारखाना जर लवकर चालू झाला नाही तर बैलांना चारा उपलब्ध कोठून होणार असा प्रश्न ऊसतोड मजूर पुढे निर्माण झालेला आहे. मात्र याच ऊसतोड मजुरांच्या येण्यामुळे बाजारपेठ यातील अनेक दुकानांमध्ये गर्दी देखील होत आहे