खळबळ जनक. सोमेश्वर परिसरातील आणखी एका नामांकित पतसंस्थेचा घोटाळा येणार उघडकीस?

सामाजिक

संपादक : मधुकर बनसोडे

निंबुत येथील काही दिवसापूर्वीच एका पतसंस्थेचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर ठेवीदारांचे तोंडचे पाणी पळाले. तोवरच सोमेश्वर परिसरामधील एका नामांकित पतसंस्थेची चौकशी सुरू असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेली आहे.

सोमेश्वर परिसरामध्ये नक्कीच चालले तरी काय? गोरगरिबांनी पै-पै गोळा करून ठेवलेल्या पैशांवर पांढऱ्या कपड्यातील काळे बोके जणू नजर ठेवून असल्याच्या चर्चा सुरू आहेत. ज्या नामांकित पतसंस्थेची चौकशी सुरू आहे, ती संस्था गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांच्या चर्चेमध्ये होती. चौकशी अहवालामध्ये सदरची पतसंस्था दोषी आढळल्यास कोट्यावधी रुपयांच्या ठेवीला चुना लागणार की काय, अशी भीती नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

सदर पतसंस्थेच्या चेअरमन वरती राज्यातील एका नामांकित राजकीय पुढाऱ्याचा वरदहस्त असल्यामुळे हे प्रकरण दाबले तर जाणार नाही ना, अशी चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये रंगली आहे. नेमकं सत्य लवकरच जनतेच्या समोर येणार आहे.

यासंदर्भात महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ८९अ- (१) नुसार, जर पतसंस्थेतील अधिकारी, संचालक वा कर्मचारी यांनी जाणूनबुजून खोटे दाखले सादर केले, गैरव्यवहार केला किंवा चुकीची नोंद ठेवली तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होऊन तुरुंगवास व दंडाची शिक्षा होऊ शकते. तसेच दोषी असल्यास त्यांना संचालक पदावरून दूर करण्याबरोबरच पुढे संचालक होण्यास अपात्र ठरविण्याची कारवाईही होऊ शकते.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची बातमी प्रकाशित केली जात आहे.