प्रतिनिधी –
पोलीस मित्र संघटना, नवी दिल्ली यांच्या वतीने गगनबावडा येथे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन गुरुवार, दि. ४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
या उद्घाटन समारंभाचे उद्घाटन मा. श्री. बी. जी. गोरे (तहसीलदार), मा. श्री. जी. एम. भगत (राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख, पोलीस मित्र संघटना) तसेच मा. श्री. जानदेव बापू (सहाय्यक निरीक्षक, गगनबावडा पोलीस स्टेशन) यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून मा. सौ. सरिता दीपक पाटील (सरपंच, ग्रामपंचायत निवडे), मा. सौ. मेघा प्रकाश कांबळे (उपसरपंच, निवडे), मा. श्री. दगडू बापू भोसले (सरपंच व चेअरमन, सेवा सोसायटी), मा. सौ. संगिता दादू पाटील (समिती सदस्य, ग्रामपंचायत) आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री. विजय ठाकूर (सहाय्यक उपनिरीक्षक, गगनबावडा पोलीस), मा. श्री. पांडुरंग लक्ष्मण हातेकर (उपाध्यक्ष, सांगली जिल्हा पोलीस मित्र संघटना), मा. सौ. सुरेखा संभाजी चव्हाण (उपाध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा), मा. सौ. रेखा अप्पासाहेब नाईक (जनसंपर्क प्रमुख, कोल्हापूर जिल्हा), रेखा बसगोंडा पाटील (निरीक्षक, महिला आघाडी, कोल्हापूर जिल्हा) तसेच मा. श्री. शिवाजी शंकर कांबळे (सचिव, संघटना गगनबावडा) यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे आयोजन मा. सौ. रेश्मा राजेश चिटणीस (जिल्हा अध्यक्षा, महिला आघाडी, पोलीस मित्र संघटना, कोल्हापूर) यांनी केले होते. कार्यक्रम स्थळ म्हणून समग्र ग्रामपंचायत निवडे निश्चित करण्यात आले होते.