प्रतिनिधी.
आज सात सप्टेंबर रोजी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची 234 वी जयंती नींबूत येथे मोठ्या उत्साहात पार पडली.
राजे उमाजी नाईक यांचे जन्मगाव भिवडी येथून ज्योत प्रज्वलित करून नींबूत येथे सकाळी आठ वाजता आणण्यात आली ज्योतीचे मोठ्या उत्साहाने ग्रामस्थांनी स्वागत केले.
सकाळी दहा वाजता ज्योत पूजन करून आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या अर्धकृती पुतळ्याचे लोकार्पण शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांच्यासह इतर मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सतीश काकडे होते.
या कार्यक्रमासाठी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन शहाजी काकडे, पुणे जिल्हा आरोग्य व बांधकाम समिती मा. सभापती प्रमोद काकडे, सोमेश्वर कारखान्याचे विद्यमान संचालक अभिजीत काकडे, मदन काकडे, सोमेश्वर कारखान्याचे माजी संचालक महेश काकडे, निंबुत ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य नंदकुमार काकडे, उपसरपंच अमर काकडे, जय मल्हार क्रांती संघटनेच्या महिला अध्यक्ष संगीता जाधव,माझी उपसरपंच उदयसिंह काकडे, विजय काकडे, दिग्विजय काकडे, भीमराव बनसोडे,. आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना राजे उमाजी नाईक यांच्या कार्याचा व त्यांच्या विचाराचा उजाळा जनतेसमोर मांडला.
अध्यक्ष भाषणात मनोगत व्यक्त करताना सतीश काकडे यांनी सांगितले की निंबूत गाव हे सर्व समाजाला पुढे घेऊन नेहमी जात आहे जात राहील राजे उमाजी नाईक यांना समाजापुरतं न बांधून ठेवता प्रत्येक समाजाने त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन जीवनाची यशस्वी वाटचाल केली पाहिजे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन जाधव. यांनी केले तर आभार सागर जाधव यांनी मानले