प्रतिनिधी – फिरोज भालदार
आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची २३४ वी जयंती वडगाव निंबाळकर मध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. राजे उमाजी नाईक यांच्या २३४ व्या जयंती उत्साह सोहळ्यानिमित्त वडगाव निंबाळकर आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान यांच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
रविवार दिनांक ७ सप्टेंबर रोजी राजे उमाजी नाईक यांचे जन्मगाव भिवडी येथून ज्योत प्रज्वलित करून वडगाव निंबाळकर येथे आणण्यात आली.
वडगाव निंबाळकर ग्रामस्थ व राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान यांच्यावतीने क्रांतिज्योतीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. सायंकाळी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून पारंपारिक पद्धतीने आकर्षक रथ व रोषणाई करून मिरवणूक काढण्यात आली .
यावेळी सरपंच सुनील ढोले,पुणे जिल्हा PDC बँकेचे संचालक संभाजीनाना होळकर , वडगाव निंबाळकर पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील , पंचायत समिती माजी सभापती अविनाश (बाबा) शिंदे, जितेंद्र पवार,राजेश्वरराजे राजेनिंबाळकर, संजय साळवे , अजित भोसले , राजूशेठ शहा , सचिन साठे , मुन्ना बागवान, आदी मान्यवर उपस्थित होते .
कार्यक्रमावेळी आलेल्या मान्यवरांनी व वडगाव निंबाळकर ग्रामस्थांनी या कार्यक्रमाविषयी राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष सुनील खोमणे यांनी सर्वच कार्यक्रम चांगल्या रित्या व पारंपरिक पद्धतीने केले त्यांच कौतुक देखील करण्यात आले व असे वडगाव निंबाळकर मधील सर्वच कार्यक्रम अश्याच पारंपारिक पद्धतीने सर्वांनी राबवावेत असे मान्यवर यांच्याकडून संबोधण्यात आले.
या कार्यक्रमावेळी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान वडगाव निंबाळकर संस्थापक अध्यक्ष सुनील खोमणे ,मार्गदर्शक शिवाजी खोमणे ,दिलीप भंडलकर ,रमेश भंडलकर ,हरिभाऊ भंडलकर ,बाळासाहेब खोमणे ,संजय चव्हाण ,योगेश खोमणे , प्रताप खोमणे , लालासाहेब खोमणे व वडगाव निंबाळकर ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.