दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी मु.सा.काकडे महाविद्यालयाच्या आर्यवीर पाटीलची निवड

Uncategorized

प्रतिनिधी
सोमेश्वरनगर. महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अंतर्गत लातूर येथे १६ ते १८ ऑक्टोबर रोजी संपन्न झालेल्या राज्यस्तरीय जलतरण (ब्रेस्ट स्ट्रोक ५०,१००,२०० मीटर ) स्पर्धेत चमदार कामगिरी करत आर्यवीर अश्विनकुमार पाटील(१२ वी वाणिज्य १९ वर्ष वयोगटात प्रथम क्रमांक (सुवर्ण 🥇पदक) मिळवून दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली.
यशस्वी खेळाडू विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष सतीश भैय्या काकडे देशमुख महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष तथा सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक अभिजीत भैय्या काकडे देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, संस्थेचे सचिव सतीश लकडे यांनी अभिनंदन केले. दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यशस्वी खेळाडू विद्यार्थ्याला वरिष्ठ महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. बाळासाहेब मरगजे, प्रा.दत्तराज जगताप व सुप्रिया पाटील यांनी मार्गदर्शन केले.