बारामती पंचायत समिती निंबुत गटातून किरण काकडे लढवणार निवडणूक.

Uncategorized

प्रतिनिधी.
सध्या सर्वत्र जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपली इच्छा नेत्यांकडे व्यक्त करीत निवडणूक लढवण्याचे संकेत देण्यास सुरुवात केली आहे आज आमच्या प्रतिनिधीशी बोलताना किरण काकडे यांनी देखील बारामती पंचायत समिती साठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून नींबूत गटातून निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून किरण काकडे यांनी अनेक अपंग बांधवांना न्याय मिळवून देण्याचे काम बारामती तालुक्यामध्ये केले आहे किरण काकडे हे उच्च शिक्षित असून तरुण पिढीचा त्यांच्याकडे असलेला कल पाहता यावर्षी बारामती तालुक्यात वेगळे चित्र पाहायला मिळणार का. कोविड काळामध्ये किरण काकडे यांच्या माध्यमातून अनेक गरजूवंतांना मेडिकल मदत करण्यात आली होती सामान्य कुटुंबातला पोरगा पंचायत समिती गणासाठी निवडणूक लढवीत असल्यामुळे परिसरातून देखील शुभेच्छांचा वर्षाव किरण काकडे यांच्यावरती होत आहे किरण काकडे यांच्या पत्नी सौ. आरती काकडे या नींबूत ग्रामपंचायत च्या विद्यमान सदस्य आहेत ग्रामपंचायत च्या माध्यमातून त्यांनी अनेक विकास कामांना गती दिलेली आहे याचा देखील फायदा पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये किरण काकडे यांना होईल अशी चर्चा परिसरामध्ये नागरिकांमधून होत आहे लवकरच प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून व किरण काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बारामती पंचायत समिती नींबूत गटातील युवकांचा भव्य मेळावा घेणार असल्याचे किरण काकडे यांनी यावेळी बोलताना सांगितले.