प्रतिनिधी.
बारामती – आरोग्य शिबिर,रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, पूरग्रस्त मदत असे विविध उपक्रम भारतीय पत्रकार संघ नेहमीच राबत असतो.यावर्षी दीपावली सण निमित्त दीपावली निमित्त गरजू कुटुंब यांना फराळ वाटप करण्याचा निर्णय पुरंदर मधील निरा – शिवतक्रार ग्रामपंचायत कार्यालय येथे झालेल्या मासिक मीटिंग मध्ये भारतीय पत्रकार संघ पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष सिकंदर नदाफ यांच्या मार्गदर्शनाने अध्यक्ष मधुकर बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला उपस्थित सर्व सदस्यांनी सहमती देत या उपक्रमाचे कौतुक केले यावेळी माजी अध्यक्ष विनोद गोलांडे ,उपाध्यक्ष मोहम्मद शेख, खजिनदार सोमनाथ लोणकर, संघटक फिरोज भालदार सदस्य ज्येष्ठ पत्रकार सुभाष जेधे, शौकत शेख प्रेस फोटोग्राफर जितेंद्र काकडे उपस्थित होते.
बारामती तालुक्यातील पश्चिम भागातील विविध गावांमधील गरजू कुटुंबांना पदाधिकारी सदस्यांमार्फत घरपोच दिवाळी फराळ वाटप केल्याने भारतीय पत्रकार संघाचे कौतुक होत आहे.