निंबुत गटातून अनेक जण पंचायत समिती लढवण्यासाठी इच्छुक. निवड करताना पक्षश्रेष्ठींची होणार दमछाक.

Uncategorized

प्रतिनिधी.
बारामती तालुक्यातील पंचायत समितीचे आरक्षण सोडत जाहीर झाल्यापासून अनेक जणांनी पंचायत समितीला आपले तिकीट फिक्स करण्यासाठी मोठी फिल्डिंग लावलेली दिसत आहे निंबुत गटामधून अनेक जण निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे यामुळेच नेत्यांची देखील तिकीट नक्की द्यायचं कोणाला कोणाची नाराजी परवडेल कोणाची नाराजी भविष्यात पक्ष्यासाठी अडचणीची होईल याचा सर्व विचार करूनच नेत्यांना देखील तिकीट वाटप
करावे लागेल. त्यामुळे आगामी काळामध्ये तिकीट वाटप करीत असताना नेत्यांची देखील मोठी दमछाक होऊ शकते.
काही महिन्यांमध्ये निंबूत ग्रामपंचायतची निवडणूक होत आहे तत्पूर्वी पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका होणार आहे त्यामुळे ज्याला नींबूत ग्रामपंचायतची उमेदवारी मिळणार नाही तो पंचायत समिती जिल्हा परिषदेसाठी फिल्डिंग लावताना दिसत आहे. सत्तेच्या या मांडवा खालून आपण देखील नाहून निघावे अशी भावना इच्छुक उमेदवारांची दिसत आहे. पंचायत समिती,जिल्हा परिषद,ग्रामपंचायत. मध्ये नक्की नींबूत गटातून कोणाला संधी मिळणार की वाद विवाद टाळण्यासाठी वरिष्ठ नेत्यांकडून नींबूत सोडून इतर ठिकाणी उमेदवारी दिली जाणार हे काही दिवसातच निश्चित होईल.