मु.सा.काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे  ‘समाज भूषण पुरस्काराने सन्मानित.

Uncategorized

सोमेश्वरनगर प्रतिनिधी
शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना ‘समाज भूषण पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले आहे.

हा पुरस्कार विश्वकर्मा ग्रामीण शैक्षणिक विकास संस्था, विष्णूपुरी (नांदेड, महाराष्ट्र) आणि एन. आर. डी. फूड प्रोडक्ट्स, चिंचोली तपसे (लातूर) यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार समारंभ डॉ. दिगंबर नेटके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

डॉ. वायदंडे हे शिक्षण क्षेत्रातील दूरदृष्टी, समाजाभिमुख कार्य आणि विद्यार्थी घडविण्याच्या अथक प्रयत्नांमुळे ओळखले जातात. ग्रामीण भागातील शैक्षणिक उन्नतीसाठी तसेच समाजातील सकारात्मक बदल घडविण्यासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे.

पुरस्कार स्विकारताना डॉ. वायदंडे यांनी सांगितले की, “हा सन्मान केवळ माझा नसून समाजात कार्यरत असलेल्या प्रत्येक शिक्षक आणि कार्यकर्त्याचा आहे. हा पुरस्कार पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरेल.”लातूर येथे झालेल्या या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांच्या वतीने राज्यशास्त्र विभागाचे प्रा .नारायण राजूरवार यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

मु. सा. काकडे महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. सतीशराव काकडे देशमुख, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष श्री. प्रियराज काकडे देशमुख, सचिव श्री. सतीश लकडे यांनी या पुरस्काराबद्दल डॉ. वायदंडे यांचे अभिनंदन केले तसेच सर्वत्र विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.