प्रतिनिधी.
तालुका कृषि अधिकारी, बारामती मा. सचिन हाके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे खंडोबाचिवाडी येथे जागतिक मृदा दिन दिनांक 5 डिसेम्बर रोजी साजरा करण्यात आला. या निमित्ताने वडगांव निंबाळकर चे मंडल कृषि अधिकारी मा. आप्पासाहेब झंजे यांनी जागतिक मृदा दिनाचे महत्व सांगितले, या मद्धे जागतिक मृदा दिन थायलंड चे राजे भूमिबोल अडुळयांडेज यांच्या जन्म दिवशी हा दिवस साजरा केला जातो. त्यांनी मृदा संवर्धणासाठी दिलेल्या योगदानबद्दल हा दिवस निवडल्याचे सांगितले.. तसेच मृदा दिन साजरा करण्याची का गरज आहे, जमिनीचे आरोग्य जपण्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा वापर, माती परीक्षणानुसार खतांचा वापर, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान या बाबत माहिती दिली. यावेळी उप कृषि अधिकारी माने यांनी मातीचा प्रतिनिधिक नमुना कसा घ्यावा या बाबत प्रत्यक्षिकाद्वारे माहिती दिली. या दिनाचे नियोजन सहाय्यक कृषि अधिकारी ज्योती गडाख यांनी केले तर प्रविण कोरडे यांनी आभार मानले.













