Image

सोमेश्वरने केली एफ.आर.पी. वरील व्याजाची रक्कम जमा

प्रतिनिधी

शासनाच्या नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी.) रु.३,२८५/- प्र.मे.टन इतका निघत असून संचालक मंडळाने प्रथम हप्त्यापोटी रु.३,३००/- प्र.मे.टन देण्याचे निश्चित केलेले आहे. दि. १ ते १५ नोव्हेंबर या कालावधीमध्ये गळीतास आलेल्या ऊसाची प्रथम हप्त्याप्रमाणे होणारी रक्कम ऊस उत्पादक सभासदांच्या बँक खात्यामध्ये दि.२९ नोव्हेंबरला वर्ग केली असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष श्री. पुरुषोत्तम जगताप यांनी दिली. आजअखेर कारखान्याने ३ लाख ०१ हजार ७६० मे. टनाचे गाळप पुर्ण केले असून जिल्ह्यामध्ये उच्चांकी साखर उतारा राखत ३ लाख १४ हजार ९५० साखर पोत्यांचे उत्पादन घेतल्याचे यावेळी श्री. जगताप यांनी सांगितले.

श्री. जगताप पुढे म्हणाले की, राज्य शासनाच्या निर्णयानुसार गळीतास आलेल्या ऊसाची किमान आधारभूत किंमत (एफ.आर.पी.) १४ दिवसांमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करणे बंधनकारक होते. त्यानुसार सुरुवातीच्या कालावधीमध्ये गळीतास आलेल्या ऊसासाठी प्रथम हप्ता देणेबाबत उशीरा निर्णय झालेमुळे सदर कालावधीमधील रकमेवर १५ टक्क्याप्रमाणे देय होणारी व्याजाची रक्कम दि.२५/११/२०२५ रोजीच्या संचालक मंडळाच्या निर्णयानुसार सभासदांच्या खात्यावर वर्ग करणेचा निर्णय झालेला आहे. यामध्ये हंगाम २०२१-२०२२ मधील रु.१ कोटी १० लाख इतकी रक्कम जानेवारी २०२३ मध्येच सभासदांचे खात्यावर वर्ग केलेली आहे. उर्वरीत हंगाम २०२२-२०२३ मधील रु.२३ लाख ९० हजार, हंगाम २०२४-२०२५ मधील रु.४० लाख ६८ हजार व हंगाम २०२४-२०२५ मधील रु.६४ लाख ५८ हजार अशी एकूण रु.१ कोटी २९ लाख व्याजापोटीची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर दि.०२/१२/२०२५ रोजी वर्ग केलेली आहे. राज्यामध्ये उशीरा दिलेल्या एफ.आर.पी.वरील व्याजाची रक्कम देणारा कदाचित सोमेश्वर हा एकमेव कारखाना असेल असे देखिल श्री. जगताप यांनी यावेळी सांगितले.

कारखान्याने हंगाम २०२१-२०२२ मध्ये एफ.आर.पी.पेक्षा प्र.मे.टन रु.२१८.३७ प्रमाणे जादा रु.२८ कोटी ९४ लाख, हंगाम २०२२-२०२३ मध्ये रु.४९९.५१ प्रमाणे जादा रु.६२ कोटी ७७ लाख, हंगाम २०२३-२०२४ मध्ये रु.६९७.०२ प्रमाणे जादा रु.१०२ कोटी ११ लाख व हंगाम २०२४-२०२५ मध्ये रु.२२६.९४ प्रमाणे जादा रु.२५ कोटी २३ लाख इतकी रक्कम दिलेली आहे. सोमेश्वर कारखाना गेली ९ वर्षापासून एफ.आर.पी. पेक्षा जादा दर देत असून यावर्षीदेखिल जादा ऊस दराची परंपरा सोमेश्वर कारखाना कायम राखणार असल्याचे श्री. जगताप यांनी यावेळी सांगितले.

Releated Posts

कामाच्या तासानंतर ‘डिस्कनेक्ट’ राहण्याचा हक्क: ‘राईट टू डिस्कनेक्ट’ विधेयक संसदेत सादर 

प्रतिनिधी ​कर्मचाऱ्यांच्या ताणमुक्तीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल; खासगी सदस्याचे विधेयक सादर.  आधुनिक कार्यशैलीमध्ये कर्मचाऱ्यांवरील वाढता मानसिक ताण आणि कामाच्या तासांनंतरही…

ByBymnewsmarathi Dec 9, 2025

प्रवेशापूर्वी गर्भधारणा चाचणीची सक्ती; चौफेर टीका झाल्यावर नियम तत्काळ रद्द;

प्रतिनिधी   ​पुणे जिल्ह्यातील एका शासकीय वसतिगृहात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी ‘प्रेग्नन्सी टेस्ट’ (गर्भधारणा चाचणी) अनिवार्य करण्यात आल्याची धक्कादायक…

ByBymnewsmarathi Dec 9, 2025

तुऱ्यामुळे उसाच्या उत्पादनाची चिंता आणि कारखान्यापुढील आव्हान

संपादक- मधुकर बनसोडे ​सोमेश्वर सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रात सध्या उसाला मोठ्या प्रमाणात तुरा आल्याने ऊस उत्पादक शेतकरी आणि…

ByBymnewsmarathi Dec 6, 2025

ऊस वाहतुकीचा धोका! भवानीनगरजवळ उतारावर बैलगाडी उलटली; मजुरासह कुटुंबाचा जीव धोक्यात

प्रतिनिधी ​साखर कारखान्यांसाठी ऊस वाहतूक करताना मजुरांनी सुरक्षिततेचे नियम पाळावेत, या भवानीनगर येथील आवाहनाकडे दुर्लक्ष केल्याने आज पहाटेच्या…

ByBymnewsmarathi Dec 6, 2025