• Home
  • माझा जिल्हा
  • मु.सा काकडे महाविद्यालयातील आर्यवीर पाटील ची दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत चमकदार कामगिरी.
Image

मु.सा काकडे महाविद्यालयातील आर्यवीर पाटील ची दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत चमकदार कामगिरी.

प्रतिनिधी.
सोमेश्वरनगर:दिल्ली येथील श्यामाप्रसाद नॅशनल स्टेडियम येथे १ ते ५ डिसेंबर २०२५ या कालावधीत ६९ व्या नॅशनल स्कूल गेम संपन्न झाल्या.या संपन्न झालेल्या राष्ट्रीय शालेय जलतरण (ब्रेस्ट स्ट्रोक १०० मीटर) स्पर्धेत मु.सा काकडे महाविद्यालयातील आर्यवीर अश्विनकुमार पाटील (इयत्ता १२वी वाणिज्य १९ वर्ष वयोगटात रोप्य पदक प्राप्त करून महाविद्यालयाचे नाव देशपातळीवर उज्वल केले. आर्यवीर चे महाविद्यालयाचे अध्यक्ष सतीश भैय्या काकडे-देशमुख, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष तथा सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक अभिजीत भैय्या काकडे-देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे सर, संस्थेचे सचिव सतीश लकडे यांनी महाविद्यालयाच्या
वतीने यशस्वी खेळाडूचे अभिनंदन केले. यशस्वी खेळाडूला प्रा.डॉ.बाळासाहेब मरगजे,प्रा.दत्तराज जगताप, सुप्रिया पाटील यांनी मार्गदर्शन केले.

Releated Posts

सातारा जिल्हा परिषद निवडणूक गोंधळ : पोलीस अधीक्षकांवरील निलंबन कारवाईचा आदेश, पुढे काय?

प्रतिनिधी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळानंतर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.…

ByBymnewsmarathi Mar 23, 2026

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026