प्रतिनिधी –
आधीच अखेरची घटका मोजत असलेल्या कोऱ्हाळे बुद्रुकच्या बस थांब्यावर अनेक जण मोठे फ्लेक्स लावत असतात. त्यातच आता मोठे धन दांडगे राजरोसपणे बस थांब्याच्या समोरच आपल्या गाड्या पार्किंग करत असल्याने प्रवाशांचे मोठी गैरसाई होत आहे.
सोमेश्वर कारखाना सुरू झाल्याने बैलगाड्या, ट्रॅक्टर, ट्रॅक अशा ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कोऱ्हाळे वरून सोमेश्वर नीरा भागाकडे जाणारे विद्यार्थी व प्रवाशांना जपून थांबावे लागते. त्यातच काही मुजोर वाहन चालक नेमके बस थांब्यासमोर गाडी पार्क करून निश्चिंतपणे फिरत असतात. त्यामुळे एसटी चालकांना बस गाडी पुढे नेऊन थांबवावी लागते. अशावेळी विद्यार्थी व प्रवासी अक्षरशः धावत सुटतात. मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वास्तविक कोऱ्हाळे बुद्रुक बस थांब्यासमोरील कॉम्प्लेक्स च्या आवारात पार्किंग साठी जागा उपलब्ध असूनही अशा रीतीने प्रवाशांची गैरसोय होईल अशाप्रकारे वाहन चालक वाहन लावत असतात. त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी विद्यार्थी व प्रवासी करत आहेत.















