• Home
  • Uncategorized
  • मतमोजणी प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

मतमोजणी प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

प्रतिनिधी

पुणे, दि.२०: राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यात १४ नगरपरिषदा व ३ नगरपंचायतीकरिता २ आणि २० डिसेंबर २०२५ रोजी मतदानप्रक्रिया पार पडली; या निवडणुकीकरिता २१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता मतमोजणी सुरु होणार आहे, याकरीता जिल्हा प्रशासन सज्ज आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.

या मतमोजणीच्या कामकाजाकरिता राखीव कर्मचारी मिळून एकूण ९१४ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. निकालाच्यादिवशी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याकरिता पर्याप्त व पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात असून त्याअनुषंगाने प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांच्या स्तरावरून मतमोजणी कर्मचाऱ्यांची नेमणूक करून त्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. मतमोजणीच्या अनुषंगाने प्रत्येक मतमोजणी केंद्रावर आवश्यक साहित्य उपलब्ध व व्यवस्था करण्यात आल्या आहेत. मतमोजणी केंद्रात प्रवेशाकरिता संबंधित कर्मचारी, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी तसेच माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रवेशिकाही देण्यात आलेल्या आहेत. माध्यमांच्या प्रतिनिधींना फेरीनिहाय निकाल तातडीने उपलब्ध करून देण्याकरिता मतमोजणी केंद्रावर स्वतंत्र बैठक व्यवस्था (माध्यम कक्ष) तयार करण्यात आले आहेत.

संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेचा आढावा घेऊन अचूक व सुयोग्य पद्धतीने मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्याकरिता काटेकोर नियोजन व रंगीत तालीम घेण्याबाबत सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांना सूचना निर्गमित केल्या आहेत. त्याचबरोबर सुरक्षा व्यवस्थेचा आढावाही घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी दिली आहे.

Releated Posts

बेपत्ता झालेल्या दोन युवकांचा शोध घेण्यात वडगाव निंबाळकर पोलिसांना यश.

प्रतिनिधी. वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 274/2025 BNS 137(2) मधील मुले 1) शुभम गणेश जाधव वय…

ByBymnewsmarathi Dec 20, 2025

सोमेश्वर’चे अनुदान धोरण फसवे; सभासदांची दिशाभूल थांबवा – शेतकरी कृती समितीचा कारखाना प्रशासनावर हल्लाबोल

​प्रतिनिधी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने अलीकडेच जाहीर केलेले उसाचे अनुदान धोरण हे पूर्णपणे फसवे असून याद्वारे ऊस…

ByBymnewsmarathi Dec 16, 2025

पुरंदर येथील विमानतळ प्रकल्पबाधित शेतकऱ्यांबरोबर जिल्हाधिकारी यांची झाली सकारात्मक चर्चा.

प्रतिनिधी – पुरंदर येथील छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शेतकरी व ग्रामस्थांच्या जमिनीचा दर, मोबदला व…

ByBymnewsmarathi Dec 9, 2025

राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’च्या रचनेला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त लोकसभेत चर्चा करण्यात आली. या चर्चेची सुरुवात पंतप्रधान मोदी यांनी केली होती.

पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात काँग्रेस आणि जवाहरलाल नेहरू यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. जेव्हा काँग्रेस खासदार प्रियंका गांधी…

ByBymnewsmarathi Dec 8, 2025