प्रतिनिधी.
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 274/2025 BNS 137(2) मधील मुले 1) शुभम गणेश जाधव वय 16 वर्ष 2) पियुष विलास मोहिते वय 15 वर्षे दोन्ही राहणार मुर्टी तालुका बारामती जिल्हा पुणे यांना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कशाचे तरी अमिश दाखवून फुस लावून पळवून नेले होते. त्या तक्रारीच्या अनुषंगाने तपास करीत असताना तपासी अधिकारी ग्रेड पोलीस उपनिरीक्षक वारुळे साहेब यांनी तांत्रिक माहितीचा व गोपनीय बातमीदारांचा आधार घेऊन सदर बेपत्ता मुलांना भीमाशंकर तालुका खेड जिल्हा पुणे येथून ताब्यात घेऊन त्यांचे पालक श्री गणेश दामू जाधव व विलास कुंडलिक मोहिते यांना करंजेपूल पोलीस दूरक्षेत्र येथे बोलावून घेऊन मुलांना ताब्यात दिलेली आहे मुलांचे नातेवाईकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत
सदरची कामगिरी ही माननीय श्री संदीपसिंह गिल्ल सो पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण. माननीय श्री गणेश बिरादार सो अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग. माननीय श्री सुदर्शन राठोड सो उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग. यांचे मार्गदर्शनाखाली श्री नागनाथ पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक. पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे. ग्रेड पोलीस उपनिरीक्षक दीपक वारुळे. पोलीस हवलदार रमेश नागटिळक. पोलीस हवालदार अमोल भोसले यांचे पथकाने केली आहे













