क्राईम
पुरंदर.किरकोळ कारवाईनंतरही निरा मोरगाव रोडवरील त्या हॉटेल वरती अवैद्य दारू विक्री सुरूच. पोलिसांची कारवाई फक्त नावापुरतीच?
संपादक मधुकर बनसोडे. एम न्यूज मराठी ने प्रसिद्ध केलेल्या बातमीची दखल घेत काही दिवसापूर्वी निरा येथील पोलीस प्रशासनाने नीरा मोरगाव रोडवरील अवैद्य दारू विक्री करणाऱ्या हॉटेल चालकावरती तोडकीमोडकी कारवाई केली? मात्र त्या हॉटेल चालकाने पुन्हा नव्या जोमाने आपला अवैद्य दारू विक्रीचा व्यवसाय सुरू केल्याचे चित्र दिसत आहे. एम न्यूज मराठीच्या हाती आलेल्या माहितीनुसार पोलीस प्रशासनाने […]
पुरंदर. नीरा मोरगाव रोड लगत हॉटेलमध्ये अनाधिकृत विक्री होत असलेल्या अवैद्य दारू विक्रीस आशीर्वाद कोणाचा?
संपादक मधुकर बनसोडे. जेजुरी पोलीस स्टेशनचे दबंग अधिकारी पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी सह शहरातील इतर अवैद्य दारू विक्री वरती कारवाई केल्याच्या बातम्या वारंवार पाहावयास मिळत आहेत खरंतर ही आनंदाची गोष्ट आहे. मात्र नीरा नजीक निरा मोरगाव रोड वरती एका हॉटेलमध्ये अनाधिकृत रित्या राजरोसपणे मोठ्या प्रमाणात दारू विक्री केली जात असल्याची खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळत […]
पुण्यात पुन्हा कोयता गँग सक्रिय; येरवड्यात तीस ते पस्तीस वाहनांची तोडफोड
प्रतिनिधी येरवड्यात मध्यरात्री टोळक्याने दहशत माजवली. टोळक्याने ३० ते ३५ वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली. येरवड्यातील लक्ष्मी नगर भागात मध्यरात्री टोळके आले. त्यांच्याकडे कोयते होते. टोळक्याने लक्ष्मी नगर भागातील वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. विरोध करणाऱ्या नागरिकांना शिवीगाळ करून त्यांच्यावर कोणते उभारले. या घटनेमुळे नागरिक भयभीत झाले. टोळक्याने ३० ते ३५ वाहनांची तोडफोड केली. या […]
कॅन्सर झाल्याच्या गैरसमजुतीतून मुलाचा खून
प्रतिनिधी कॅन्सर झाल्याची भीती मनात बसल्याने वडिलांनी दहा वर्षीय मुलाचा गळा आवळून खून केल्याची घटना पोलीस तपासात उघडकीस आली आहे. वाठार पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त तपासात खुनाचे धागेदोरे उलगडले. या प्रकरणी विजय खताळ यांना अटक करण्यात आली असून त्यांना दि २९ पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. हिवरे (ता कोरेगाव) येथे कुंभारकी […]
माणगाव मध्ये स्फोटकांचा मोठा साठा जप्त; तीन जणांना अटक ,सुत्रधाराच्या शोधासाठी चार पथके तैनात
प्रतिनिधी नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू असतानाच रायगड जिल्ह्यातील माणगाव मध्ये जिवंत जिलेटीन आणि डेटोनेटर चा मोठा साठा पोलीसांनी हस्तगत केला आहे. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून मुळ सुत्रधाराचा शोध सुरू केला आहे. स्फोटके नेमकी कशासाठी आणण्यात आली होती याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली […]
चिमुकल्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या फुगे विक्रेत्यावर गुन्हा दाखल
प्रतिनिधी गॅसचा फुगा भरताना सिलिंडरचा अचानक स्फोट होऊन मुलाचा मृत्यू झाल्याप्रकरणी फुगे विक्रेत्यावर सदर पोलिसांनी मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला. सत्येंद्र सिंह (४५) असे आरोपी फुगे विक्रेत्याचे नाव असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. शिजान आसीफ शेख (४ वर्षे) असे मृत मुलाचे तर फारीया मुनावर अली आणि अनमता हबीब शेख अशी गंभीर जखमी महिलांची […]
मुंबई पोलिसांकडून वर्षभरात साडेचारशे कोटींचे एमडी जप्त; नाशिक, नालासोपारा, कोल्हापूरमध्ये कारखाने उद्ध्वस्त
प्रतिनिधी नववर्षांच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या रेव्ह पाटर्यांवर करडी नजर असलेल्या मुंबई पोलिसांनी या वर्षभरात सुमारे साडेचारशे कोटींचे अमलीपदार्थ जप्त केले आहेत. त्यात सर्वाधिक म्हणजे चारशे कोटींहून अधिक किमतीचे मेफ्रेडन (एमडी) जप्त करण्यात आले आहे. याशिवाय मुंबई पोलिसांनी वर्षभरात सुमारे चार हजार ८०० कोटी रुपयांचे अमलीपदार्थ नष्ट केले आहेत. यावर्षी मुंबई पोलिसांनी नाशिक व सोलापूर येथील एमडी […]
पोलिसांवर गोळीबार करुन पसार झालेला दरोडेखोर जेरबंद; पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यात गुन्हे
प्रतिनिधी पुण्यासह नगर, सोलापूर जिल्ह्यात घरफोडी, तसेच दरोडा घालण्याचे गुन्हे करणारा दरोडेखोराला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. पोलिसांच्या पथकावर गोळीबार करुन पसार झालेल्या दरोडेखाेराला पकडण्यासाठी सोलापूर आणि नगर पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत होते. हडपसर भागात गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला सापळा लावून पकडले. त्याच्याकडून सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हंसराज रणजीतसिंग टाक (वय […]
मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांचे दागिने हिसकावणारे जेरबंद; ज्वेलर्सलाही ठोकल्या बेड्या
प्रतिनिधी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणाऱ्या टोळीला पिंपरी-चिंचवडच्या गुन्हे शाखा युनिट चारने बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून १४ गुन्हे उघड झाले असून १६ लाख ३० हजारांचे २५ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. या गुन्ह्यामध्ये आनंद लोहार, अक्षय अशोक मुरकुटे, गणपत जवाहरलाल शर्मा (चोरीचे दागिने घेणारे ज्वेलर्स) आणि दर्शन रमेश पारीख (चोरीचे दागिने घेणारे […]
क्रिकेट खेळण्याच्या वादातून शिवीगाळ, पाठलाग करत तरुणाला संपवलं
प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चाकण परिसरातून एका धक्कादायक घटना समोर आली आहे. क्रिकेट खेळण्याच्या वादातून एका २५ वर्षीय तरुणाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. आकाश बापू बनसोडे (वय २५) असं खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रथमेश उर्फ बाळू फड, सम्यक दिलीप गणपिर, भीमराज मारुती […]
