Home
मुंढव्यात बंगल्यात आग; महिलेसह दोघे जखमी – शहरात तीन ठिकाणी आग
प्रतिनिधी शहरात तीन ठिकाणी आग लागल्याची घटना बुधवारी घडली. मुंढव्यातील एका बंगल्यात स्वयंपाकघरात लागलेल्या आगीत आई आणि मुलगा जखमी झाल्याची घटना घडली. मुंढव्यातील झगडे पार्क परिसरात संकल्प बंगल्यात दुपारी आग लागली. आगीत अंजली इश्वर सकट (वय ५८) आणि त्यांचा मुलगा जतिन (वय ३२) जखमी झाले. बंगल्यात आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव […]
सदाशिव पेठेतील खजिना विहीर विठ्ठल मंदिरात चोरी
प्रतिनिधी सदाशिव पेठेतील खजिना विहीर विठ्ठल मंदिरात चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी मूर्ती, तसेच चांदीचे मखर चोरून नेले. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गौरव ज्ञानेश्वर सिन्नरकर (वय ३८, रा. खजिना विहीर चौक, सदाशिव पेठ) यांनी याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदाशिव पेठेतील खजिना विहीर चौकात श्री विठ्ठल मंदिर आहे. मंदिराच्या […]
डॉक्टरची एक कोटींची फसवणूक! परदेशातील कुरिअरमध्ये अमली पदार्थ सापडल्याची बतावणी
प्रतिनिधी पोलिसी कारवाईची भिती दाखवून फसवणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. परदेशातून पाठविलेल्या कुरिअरच्या पाकिटात अमली पदार्थ, परदेशी चलन सापडल्याची बतावणी करुन नागरिकांकडून पैसे उकळले जात आहेत. बाणेर भागातील एका डॉक्टरची सायबर चोरट्यांनी एक कोटी एक लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत एका डॉक्टरांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी […]
वेबसिरीज बघून आखला अपहरणाचा कट; तरुणीचे अपहरण, प्रेमीयुगुल…
प्रतिनिधी कार्यालयातून घरी परतणाऱ्या अभियंता तरूणीचे प्रेमी युगुलाने पिस्तूलच्या धाकावर अपहरण केले. तिच्या मोबाईलवरून वडिलांना फोन करून ‘मुलगी जिवंत पाहिजे असल्यास तीस लाख रुपये तयार ठेवा,’ अशी धमकी देऊन खंडणी मागितली. अपहरण आणि धमकीमुळे तरूणीच्या वडिलांचा थरकाप उडाला. त्यांनी लगेच पोलिसांची मदत घेतली. प्रतापनगर पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे लोकेशन मिळवून अपहृत […]
मेळघाटात कारची दुचाकीला धडक, चार जण ठार
प्रतिनिधी मेळघाटातील घुटी गावाजवळ भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. हा अपघात रविवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडला. दादू भब्बा दारशिंबे (२७, रा. सावऱ्या), दादू याची पत्नी शारदा दारशिंबे (२४) आणि त्यांची दोन लहान मुले या अपघातात ठार झाली आहेत. होळीच्या […]
आपटे रस्त्यावर हॉटेल व्यावसायिकावर हल्ला करणारे गजाआड; संपत्तीच्या वादातून मेहुण्याकडून मध्य प्रदेशातील पहिलवानांना सुपारी
प्रतिनिधी आपटे रस्त्यावरील एका हाॅटेल व्यावसायिक तरुणावर झालेल्या हल्ल्याचा छडा गुन्हे शाखेने लावला. तरुणाचा खून करण्यासाठी मेहुण्याने मध्य प्रदेशातील पहिलवानांना सुपारी दिल्याचे तपासात उघडकीस आले. याप्रकरणी गुन्हे शाखेने दोघांना अटक केली. संपत्तीच्या वादातून हल्ला करण्यात आल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळाली आहे. महेश महादेव ठोंबरे (वय २८, रा. संगमवाडी, सध्या रा. आगरवाले तालीम, कसबा पेठ), अश्विनीकुमार […]
छळाला कंटाळून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; पतीसह सासू, नणंदेविरुद्ध गुन्हा
प्रतिनिधी सासरकडील छळाला कंटाळून महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वाघोली परिसरात घडली. महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सासू, नणंदेविरुद्ध लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रीती संजय शिंदे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती संजय सखाहरी शिंदे, सासू इंदूमती शिंदे (दोघे रा. ऐश्वर्य लक्ष्मी सोसायटी, वाघोली, नगर रस्ता), नणंद प्रतिभा गणेश माळोदे (रा. […]
अल्पवयीन मुलीशी विवाह, मारहाण करून गर्भपात; पतीसह पाचजणांवर गुन्हा
प्रतिनिधी अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी विवाह करण्यात आला. घर घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी छळ, तसेच तिचा गर्भपात केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पतीसह पाचजणांविरुद्ध पर्वती पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका २० वर्षीय तरुणीने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार पती विश्वास राजेंद्र ताकतोडे (वय २५), सासरे राजेंद्र माणिकराव […]
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या आचार संहिता कालावधीत विभागीय लोकशाही दिन रद्द*
प्रतिनिधी. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची आचार संहिता १६ मार्च ते ६ जून या कालावधीत घोषित केली आहे. या आचार संहिता कालावधीत पुणे विभागातील पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक होणार असल्याने माहे एप्रिल व माहे मे च्या पुणे विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन केले जाणार नाही, अशी […]
‘आनंदाचा शिधा’ दोन महिने बंद; आचारसंहितेमुळे मोफत वस्तू वाटपास प्रतिबंध
प्रतिनिधी राज्य सरकारने दुर्बल घटक, सामान्य नागरिकांना शिधावाटप दुकानाच्या माध्यमातून सण, उत्सवाच्या काळात लागणारे अत्यावश्यक साहित्य किरकोळ दराने वाटप करण्याचे धोरण अवलंबिले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने आनंदाचा शिधा दोन महिने बंद राहणार आहे. मोफत पिशव्या, साड्या, शिधा वाटप करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. दीड वर्षाच्या कालावधीत राज्य सरकारने १०० रुपये दर आकारून […]