• Home
  • माझा जिल्हा
  • मुंढव्यात बंगल्यात आग; महिलेसह दोघे जखमी – शहरात तीन ठिकाणी आग
Image

मुंढव्यात बंगल्यात आग; महिलेसह दोघे जखमी – शहरात तीन ठिकाणी आग

प्रतिनिधी

शहरात तीन ठिकाणी आग लागल्याची घटना बुधवारी घडली. मुंढव्यातील एका बंगल्यात स्वयंपाकघरात लागलेल्या आगीत आई आणि मुलगा जखमी झाल्याची घटना घडली. मुंढव्यातील झगडे पार्क परिसरात संकल्प बंगल्यात दुपारी आग लागली. आगीत अंजली इश्वर सकट (वय ५८) आणि त्यांचा मुलगा जतिन (वय ३२) जखमी झाले. बंगल्यात आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. स्वयंपाकघरातील गॅस सिलिंडरमधून गळती होत असल्याचे आढळून आले. जवानांनी तातडीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आगीत स्वयंपाकघरातील साहित्य जळाले. आगीत अंजली आणि त्यांचा मुलगा जतिन जखमी झाले. जवानांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. अग्निशमन अधिकारी प्रमोद सोनवणे, शौकत शेख तांडेल रणदिवे, जगताप, बिचकुले, कवडे, कांबळे यांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली.

उंड्री येथील होले वस्ती परिसरात बुधवारी सकाळी आठच्या सुमारास एका भंगार माल दुकानाला आग लागली. आगीत भंगार माल जळाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अर्धा तासात आग आटोक्यात आणली. अग्निशमन अधिकारी कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दहा जवानांनी आग आटोक्यात आणली. घोरपडीतील बी. टी. कवडे रस्त्यावर सोलेस पार्क सोसायटीत रोहित्राला आग लागली. जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली.

खेड शिवापूर परिसरात एका रंगाच्या कंपनीत आग लागल्याची घटना घडली. पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.

Releated Posts

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.

उपसंपादक- अक्षय थोरात  मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026