Home
स्पर्धा परीक्षार्थी तरुणीची १५ लाखांची फसवणूक
प्रतिनिधी ऑनलाइन टास्कच्या आमिषाने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीची सायबर चोरट्यांनी १५ लाख ४७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणी नारायण पेठेतील एका वसतीगृहात राहायला असून, ती स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. सायबर […]
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी साधु बल्लाळ*
प्रतिनिधी. बारामती: येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे निष्ठावंत सक्रीय कार्यकर्ते तसेच जिल्हा दक्षता समितीचे अभ्यासू सदस्य साधु रावसाहेब बल्लाळ यांची राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या सूचनेनुसार व त्यांच्या हस्ते राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पक्षाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. सदरचे नियुक्तीचे पत्र राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसेच पुणे जिल्हा अध्यक्ष पै.सचिन घोटकुले यांनी दिले. साधु बल्लाळ यांचा […]
*निवडणूक आचारसंहिता भंगाच्या तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक*
प्रतिनिधी. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता भंगाच्या तक्रारीसाठी जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे टोल फ्री संपर्क क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून निवडणूक आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी तात्काळ सुरू झाली आहे.नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी करावयाच्या असल्यास त्यांनी १८००२३३०१०२ आणि १९५० टोल फ्री क्रमांकावर नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. या […]
निवडणूक आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी तात्काळ सुरू करा-जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे*
प्रतिनिधी. पुणे, दि. १६: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला असून स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या परिसरात निवडणूक आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी तात्काळ सुरू करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी दिले. आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस शिरुर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे, उप […]
मौजे सोमेश्वरनगर येथे १०० खाटांचे आरोग्य पथक स्थापन करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित*
बारामती, दि.१६: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती या संस्थेच्या अधिनस्त १०० खाटांचे आरोग्य पथक मौजे सोमेश्वरनगर (वाघळवाडी) येथे स्थापन करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामती परिसरातील नागरिकांसाठी विविध आरोग्यविषयक पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोमेश्वरनगर […]
गौतम शहाजीराव काकडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त भैरवनाथ मंदिरास स्पीकर सेट भेट.
प्रतिनिधी. निंबुत गावचे युवा नेतृत्व श्री गौतम शहाजीराव काकडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गौतम भैया काकडे युवा मंच यांच्या वतीने नींबूत येथील भैरवनाथ मंदिर येथे दोन करणे, एक मशीन, एक माईक, माइक स्टॅन्ड, असा संच उपलब्ध करून देण्यात आला आज हा संच देवस्थान कमिटीचे सदस्य विजयराव काकडे, हिंदुराव काकडे यांच्याकडे श्री गौतम काकडे यांच्या हस्ते […]
अष्टावधानी फाउंडेशन व ग्रामपंचायत निंबूत, यांच्या वतीने अजित दादा यांच्या विशेष प्रयत्नातून दिव्यांग बांधवांना तीन चाकी सायकलचे वाटप.
प्रतिनिधी. अष्टावधानी संतुलन फाउंडेशन च्या वतीने व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष प्रयत्नातून ग्रामपंचायत निंबूत येथे दिव्यांग बांधवांसाठी इलेक्ट्रिक सायकल चे वाटप ग्रामपंचायत निंबूत कार्यालय येथे करण्यात आले. यासाठी लाभार्थी म्हणून, संजय नानासो भंडलकर, प्रतीक्षा अभिजीत बनसोडे यांची निवड करण्यात आली, या कार्यक्रमासाठी निंबुत गावचे युवा नेते गौतम शहाजीराव काकडे, ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार काकडे, […]
डॉ. उज्ज्वला दिनकर पाटील यांना राष्ट्रीय महिला संसद उत्कृष्ट पुरस्कार.
प्रतिनिधी – दिल्ली येथे पार्लमेंट मधील महाराष्ट्र सदन मध्ये जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेत पलूस येथील पलूस शिक्षण प्रसारक मंडळ व कनिष्ठ महाविद्यालय च्या किमान कौशल्य विभागाच्या उपप्राचार्य डॉ. उज्ज्वला दिनकर पाटील यांना राष्ट्रीय महिला संसद उत्कृष्ट पुरस्कार २०२४ मा. रिंचन ल्यांबो सदस्य मायनॉरिटी कमिशनर, भारत सरकार यांचे हस्ते प्रदान […]
घाटकोपरमध्ये अल्पवयीन मुलावर मित्रांकडूनच अत्याचार
प्रतिनिधी तीन अल्पवयीन मुलांनी नऊ वर्षाच्या मुलावरच अत्याचार केल्याची घटना घाटकोपर येथे घडली. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिन्ही मुलांना ताब्यात घेतले असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. पीडित मुलगा आणि त्याचे मित्र एकाच भागात राहणारे आहेत. गेल्या काही दिवसांपासून १२ ते १५ वयोगटातील ही मुले अल्पवयीन मुलाला एका घरात नेऊन त्याच्यावर अत्याचार करीत […]
भटका कुत्रा चावल्याने तरुणीचा मृत्यू; रेबीजविरोधी लस घेऊनही हे घडले कसे? पालकांची संतप्त विचारणा
प्रतिनिधी भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने एका २१ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तिने कुत्र्याने चावा घेतल्यानंतर रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्णत: घेतले. तरीही काही तीन दिवसांनी तिचा रेबीजमुळे मृत्यू झाला. सृष्टी सुनील शिंदे (वय २१) असे या मृत तरुणीचे नाव आहे. ती पेशाने ग्राफिक डिझायनर होती. कोल्हापूरमधील भाऊ […]