प्रतिनिधी.
दि.२१ जून विद्यालयाचा वर्धापन दिन.निंबुत ग्रामविकास प्रतिष्ठान निंबुत चे अध्यक्ष, मा.श्री. सतीशभैय्या काकडे दे. यांनी निंबुत पंचक्रोशीतील गरीब व होतकरू विद्यार्थी परिस्थितीमुळे शिक्षणाच्या प्रवाहातून बाजूला पडू नये यासाठी २१ जून १९९९ रोजी श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालय निंबुत ची स्थापना केली व खऱ्या अर्थाने निंबुत परिसरातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध झाली.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. दिपाली ननावरे यांनी आपल्या प्रास्ताविकात विद्यालय स्थापने पाठीमागे मा. श्री. सतीशभैय्या काकडे देशमुख यांचा उद्देश स्पष्ट केला व विद्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या..
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री. भीमराव बनसोडे सर यांनी विद्यालयातील माजी विद्यार्थी विविध क्षेत्रात मिळवत असलेले यश पाहून समाधान व्यक्त केले व सर्वांना विद्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
विद्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.ज्योतीताई लकडे, सध्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा मोरगाव येथे शाखाधिकारी म्हणून कार्यरत असणारे व साऊथ आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉन दौड यशस्वीरित्या पूर्ण केलेले श्री.सुजित प्रभाकर काकडे तसेच संजू केक चे मालक व यशस्वी व्यावसायिक श्री. संजय दनाने या विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरूपामध्ये आमंत्रित करण्यात आले होते. या माजी विद्यार्थ्यांचा व मान्यवरांचा विद्यालयाच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी ज्युबिलंट भारतीया फाउंडेशनच्या वतीने मा.श्री. अजयजी ढगे साहेब यांनी विद्यालयात प्रवेश घेतलेल्या नवीन विद्यार्थ्यांचे वही व पेन देऊन स्वागत केले. तसेच त्यांच्या सहकारी आदिती मॅडम यांनी पावर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पोषण आहाराविषयी माहिती दिली.
दि.२१ जून २०२५ रोजी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिन देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे कर्मचारी श्री. अमर काकडे यांनी सूक्ष्म व्यायाम प्रकार, योगासने,प्राणायाम चे पाच प्रकार भश्रिका, कपालभाती, अनुलोम-विलोम, भ्रामरी ,ओंकार यांचे आपल्या आरोग्यासाठी महत्त्व स्पष्ट केले व विद्यार्थ्यांच्याकडून हे प्राणायाम करून घेतले व योग दिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेली योगासने व प्राणायाम विद्यार्थ्यांनी नियमितपणे करण्याचे आवाहन केले..
संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. सतिशभैय्या काकडे दे. उपाध्यक्षा सौ. सुप्रियाताई अश्विनकुमार पाटील,मानद सचिव मा. श्री.मदनराव काकडे दे.यांनी विद्यालय स्थापनेपासून विद्यालयाने सर्व क्षेत्रातील केलेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले व विद्यालयाच्या यशस्वी वाटचालीबद्दल विद्यार्थी व विद्यालयातील सर्व कर्मचारी वर्ग यांचे
अभिनंदन केले. व आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या…
