प्रतिनिधी.
अष्टावधानी संतुलन फाउंडेशन च्या वतीने व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष प्रयत्नातून ग्रामपंचायत निंबूत येथे दिव्यांग बांधवांसाठी इलेक्ट्रिक सायकल चे वाटप ग्रामपंचायत निंबूत कार्यालय येथे करण्यात आले. यासाठी लाभार्थी म्हणून, संजय नानासो भंडलकर, प्रतीक्षा अभिजीत बनसोडे यांची निवड करण्यात आली, या कार्यक्रमासाठी निंबुत गावचे युवा नेते गौतम शहाजीराव काकडे, ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार काकडे, ग्रामपंचायत सदस्य सौ. विद्याताई काकडे. ग्रामपंचायत सदस्य सौ कुमोदिनीताई काकडे. विजयराव काकडे, प्रहार संघटनेचे किरण काकडे ग्रामसेवक चंद्रशेखर काळभोर, क्लार्क भाऊसो कोळेकर, राजेंद्र काकडे, यांच्यासह अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते