Home
जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्वस्त धान्य दुकान परवान्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन
प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यात २३३ ठिकाणी रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून परवाना मिळण्यासाठी ३१ जानेवारी २०२४ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. सीमा होळकर यांनी केले आहे. आंबेगाव आणि बारामती तालुक्यातील प्रत्येकी १०, भोर ७, दौंड आणि इंदापूर प्रत्येकी १, हवेली १७, जुन्नर २६, खेड ८, […]
सावित्रीबाई फुले यांची जयंती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निंबूत येथे साजरी.
प्रतिनिधी. स्त्री शिक्षणाचे दरवाजे खऱ्या अर्थाने स्त्रियांसाठी ज्यांनी खरी उघडली त्या सावित्रीबाई फुले या कार्यामध्ये नेहमीच त्यांच्या खांद्याला खांदा देऊन काम करणाऱ्या फातिमा शेख. आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंत निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निंबुत येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शाळा व्यवस्थापन समिती शिक्षक पालक वर्ग विद्यार्थी यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेतील […]
भिमा कोरेगांव शौर्य दिनाचे औचित्य साधून मेजर पोपटराव हूंबरे अध्यक्ष बहूजन समाजसेवा संघ करंजे यांच्या वतीने व नवनिर्वाचित psi कु मयुरी सावंत यांच्या शुभहस्ते जि.प.प्रा. शाळा करंजे येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप.
प्रतिनिधी बहुजन समाज सेवा संघाच्या वतीने नेहमीच तरुणांना प्रोत्साहन देण्याचे काम केले जाते. भीमा कोरेगाव शौर्य दिनाचे औचित्य साधून मयुरी सावंत यांची नुकतीच पीएसआय पदी निवड झाल्याबद्दल त्यांना बहुजन समाज सेवा संघाच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.बहूजन समाज सेवा संघामार्फत अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. स्पर्धा परिक्षा वाचनालय आसो.किंवा व्यायाम शाळा तसेच परिसरातील […]
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीतील अनधिकृत अतिक्रमणे काढून घेण्याचे आवाहन
प्रतिनिधी पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ वरील अनधिकृत अतिक्रमणे व विना परवाना बांधकाम सात दिवसाच्या आत स्वखर्चाने काढून घेण्याचे आवाहन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत करण्यात आले आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पुणे यांच्या अधिकार क्षेत्रामधील पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीमध्ये कि.मी. ८ ते कि.मी. २५२.३५० दरम्यान लगतच्या मिळकत धारकांनी अनधिकृतपणे अतिक्रमण केले असल्याचे निदर्शनास […]
नववर्षाच्या प्रारंभीच भारताची अवकाश भरारी.! ‘एक्सपोसॅट’च्या यशासाठी इसरोचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिनंदन
प्रतिनिधी अवकाशातील वेधशाळेसह, दहा उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण आणि त्यांना इच्छीत कक्षेत प्रस्थापित करण्याचा भारतीय अवकाश संशोधन संस्था – इसरोने आज नववर्षाच्या प्रारंभीच विक्रम केला आहे. इसरोच्या या ‘एक्सपोसॅट’ या महत्वाकांक्षी मोहिमेच्या अभूतपूर्व यशाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे. तसेच इसरोचे आणि या मोहिमेत सहभागी सर्वांचे अभिनंदन केले आहे. विशेष म्हणजे या मोहिमेतील […]
विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज जिल्हाधिकाऱ्यांकडून परिसरातील सुविधांचा आढावा
प्रतिनिधी पेरणे फाटा येथे १ जानेवारी रोजी आयोजित विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासनाने आवश्यक सर्व तयारी पूर्ण केली असून येणाऱ्या अनुयायांसाठी तयार करण्यात आलेल्या सुविधांचा जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी परिसराला भेट देऊन आढावा घेतला. यावेळी बार्टीचे महासंचालक सुनील वारे, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, […]
काकडे महाविद्यालयात पालक मेळावा संपन्न
प्रतिनिधी सोमेश्वरनगर- येथील मु.सा. काकडे महाविद्यालयामध्ये इयत्ता अकरावी व इयत्ता बारावी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे सर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून नुकत्याच पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्त झालेल्या मयुरी महादेव सावंत होत्या. यावेळी संस्थेचे सचिव श्री. सतीशराव लकडे, कनिष्ठ महाविद्यालयाचे […]
बारामती ! वडगाव निंबाळकर मध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न.
प्रतिनिधी- फिरोज भालदार बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर मध्ये दोन कोटी रुपये निधीचे विविध विकास कामांचा भूमिपूजन चा कार्यक्रम २९/१२/२०२३ रोजी वडगाव निंबाळकर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बारामती तालुका अध्यक्ष संभाजी नाना होळकर यांच्या हस्ते पार पडला . यामध्ये शरद नगर अंतर्गत रस्ता , उर्वरित पेरूचा माळा रस्ता कॉंक्रिटीकरण , तात्या मामुनीचे तुकाय माता मंदिर रस्ता […]
भीमा-कोरेगाव शौर्यदिन कार्यक्रम अनुषंगाने पुणे-अहमदनगर महामार्गावरील वाहतुकीत बदल.
प्रतिनिधी – दि. ०१ जानेवारी २०२४ जयस्तंभ कार्यक्रम अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पुणे यांना मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम ११५ व ११७ अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन त्यांनी मौजे पेरणेफाटा ता. हवेली जि. पुणे जि. पुणे येथे दि. १/१/ २०२४ रोजीच्या महामार्ग क्रमांक ६० वरील वाहतूक दि. ३०/१२/२०२३ रोजी सायंकाळी ५ वा.पासून ते […]
बारामती – वडगाव निंबाळकर येथील रायझिंग स्टार इंग्लिश मिडीयम स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न.
प्रतिनिधी – फिरोज भालदार ज्या पद्धतीने तुमच्या स्कूलचे नाव रायझिंग स्टार आहे. त्याच पद्धतीने जास्तीत जास्त रायझिंग स्टार हे प्रत्येक विषयात तयार झाले पाहिजे. असे मत नुकतेच पायलेट म्हणून नेमणूक झालेल्या सिद्धी घाडगे यांनी वडगाव निंबाळकर येथील रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या स्नेहसंमेलना वेळेस आपले मनोगत व्यक्त करताना वरील विधान केले आहे. बारामती तालुक्यातील वडगाव […]