Home
आरोग्य यंत्रणेचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी व्हिजन २०३५ आरोग्यावरील खर्च दुप्पट करणार, गुंतवणूक वाढविणार
प्रतिनिधी ३४ जिल्ह्यांत सुसज्ज, सुपर स्पेशालिटी जिल्हा रुग्णालये उभारण्याचे निर्देश दोन आठवड्यांत आराखडा तयार करणार औषधे खरेदी, रिक्त पद भरती तातडीने पूर्ण करणार राज्यातील एकूणच आरोग्य यंत्रणेचा संपूर्ण कायापालट होण्याच्या दिशेने आज राज्य शासनाने मोठे पाऊल टाकले आहे. सार्वजनिक आरोग्यावरील खर्च दुप्पट करणे, सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व सुविधांयुक्त स्पेशालिटी रुग्णालये उभारणे […]
शालेय विद्यार्थ्यांना वही वाटप करीत एम न्युज मराठीचा प्रथम वर्धापन दिन साजरा.
प्रतिनिधी. एम न्यूज मराठी या न्यूज पोर्टलचा प्रथम वर्धापन दिन नींबूत येथील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना खाऊ वाटप व वही वाटप करून संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन एम न्यूज मराठी टीम च्या वतीने प्राथमिक शाळा नींबूत येथे अकरा वाजता करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री अभिजीत भैय्या काकडे, युवकांचे आशास्थान श्री […]
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार
प्रतिनिधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांनी समाजासाठी केलेले कार्य उल्लेखनीय-चंद्रकांतदादा पाटील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांनी समाजासाठी केलेले कार्य उल्लेखनीय आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ माजी विद्यार्थी संघाच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित नामांकित माजी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री […]
पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन
प्रतिनिधी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध या संस्थेमार्फत पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे ९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता आयोजन करण्यात आले आहे. शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजना ही कुशल कारागीर घडविणारी योजना आहे. या मेळाव्यास अधिकाधिक आय. टी. आय. उत्तीर्ण उमेदवारांनी उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र, […]
सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयात मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत “सेल्फी विथ माटी” जागतिक विश्व विक्रम सहभाग उपक्रमाचे आयोजन करण्यात आले
प्रतिनिधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व सोमेश्वर विज्ञान महाविद्यालय , सोमेश्वरनगर राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणारे मेरी माटी , मेरा देश या अभियानांतर्गत मातीला नमन आणि वीरांचे वंदन करण्यासाठी महाविद्यालयात ‘सेल्फी विथ माटी’ जागतिक विश्वविक्रमामध्ये सहभागी होत होण्यासाठी अमृत कलश ठेवण्यात आला . यावेळेस अध्यक्ष डॉ संजय देवकर यांनी तरुण […]
सोमेश्वरच्या दिवाळीसाठी दहा किलो साखरेच्या त्या परिपत्रकावरती अजूनही सोशल मीडियामध्ये धुमशान. सोमेश्वर च्या गोड साखरेची कडू कहाणी !!
संपादक मधुकर बनसोडे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याकडून दिवाळीसाठी दहा किलो साखर देणार असल्याचे परिपत्रक जाहीर झाले आणि गेल्या दोन दिवसापासून सोमेश्वरच्या कारभाऱ्यांवरती सोशल मीडियाच्या माध्यमातून धुमशान सुरू झाले. यामध्ये कधी नव्हे ते अनेक राजकीय नेत्यांचा मोठा सहभाग असल्याचे दिसत आहे. काही नेते मंडळी तर राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांना देखील निवेदन दिले आहे निवेदनात […]
जाणूनबुजून वार्षिक सर्वसाधारण सभेस वेठीस धरणाऱ्यांना सोमेश्वरचा खोटा कळवळा – पुरुषोत्तम जगताप यांचे विरोधकांवर टिका
प्रतिनिधी सोमेश्वरनगर श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. वर्षातून एकदाच सभासदांना सर्वांसमोर बोलण्याची संधी असताना फक्त वार्षिक सर्वसाधारण सभा विरोधकांनी जाणूनबुजून वेठीस धरली व पर्यायाने जे दुरदुरुन सभासद आपले मत मांडण्यासाठी आले होते त्यांना आपली भुमिका न मांडताच यांच्या वेळकाढूपणामुळे व रटाळ निष्फळ चर्चेमुळे घरी परतावे लागले असा आरोप श्री […]
ससून सर्वोपचार रुग्णालयातील आरोग्य सेवांचा विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडून आढावा
प्रतिनिधी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यासह ससून सर्वोपचार रुग्णालयाला भेट देऊन तेथील आरोग्य सेवा, मनुष्यबळ, औषध पुरवठा आदींच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी विविध औषधोपचार कक्षांना भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी बै. जी. वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. मुरलीधर तांबे, […]
निधन वार्ता.
प्रतिनिधी. निंबुत येथील बाबासो आप्पा बनसोडे यांचे आज सायंकाळी पाच वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.ते76 वर्षाचे होते. नींबूत ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य प्रमोद बाबासो बनसोडे यांचे ते वडील होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन सुन, दोन मुली, नातवंड असा परिवार आहे. अंत्यविधी उद्या सकाळी आठ वाजता वैकुंठ स्मशानभूमी निंबुत येथे होईल.
अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
प्रतिनिधी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन २०२३ – २४ या शैक्षणिक वर्षापासून पुणे जिल्ह्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत असून पुणे जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत आपले स्वाधार अर्ज https://swadhar.acswpune.com या संकेतस्थळावर ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने भरून आपल्या महाविद्यालयाकडे जमा करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे. सामाजिक […]