Home
सर्व हातगाडी धारकांना आवाहन
प्रतिनिधी बारामती शहरामध्ये वाहतूक वाढत आहेत गुणवडी चौक ते इंदापूर चौक व गुणवडी चौकाकडून रिंग रोड कडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक हातगाडे भाजीविक्रेते तसेच इतर हॉकर्स सकाळ संध्याकाळ रस्त्यावर आपले दुकाने लावतात. त्यांच्यापुढे ग्राहक गाडीवर उभा राहतो त्यामुळे कायम त्या भागामध्ये रस्त्यात वाहतूक कोंडी होते. सणावाराच्या दिवशी व गुरुवारी तर त्या ठिकाणी चालणे सुद्धा दुरापास्त होते. […]
सकाळ एन.आय.ई.’ विनोदी लेखन स्पर्धेत श्री बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचे यश. लहान गटातून ऋतुजा बनसोडे. तर मोठ्या गटातून चमेली पवार
प्रतिनिधी निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सकाळ एन. आय. ई. (न्युजपेपर इन एज्युकेशन)च्या वतीने राबविण्यात आलेल्या, विनोदी लेखन स्पर्धेमध्ये, ‘अशी झाली फजिती’ या विषयावरील लेखन स्पर्धेत सहभाग घेतला होता. ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या वाचन व लेखन कौशल्याला वाव मिळावा तसेच विद्यार्थ्यांचे कला कौशल्य व संवाद कौशल्य वाढीस लागावे या हेतूने राबवली गेली होती. […]
महाराष्ट्र खो-खो संघाचा विजयाचा डबल धमाका; यजमान मध्य प्रदेशचे दोन्ही संघ पराभूत
प्रतिनिधी *महाराष्ट्र महिला व पुरुष खो-खो संघाचे सलग दोन विजय* *महाराष्ट्र महिला संघ १ डाव व १२गुणांनी विजयी* *महाराष्ट्र पुरुष संघ एक डाव सहा गुणांनी विजयी* चार वेळच्या किताब विजेत्या महाराष्ट्र महिला व पुरुष खो खो संघांनी आपले वर्चस्व अबाधित ठेवत खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये मंगळवारी विजयाचा डबल धमाका केला. महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी पाचव्या […]
राज्य सेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय २०२५ च्या परीक्षेपर्यंत पुढे ढकलावा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला विनंती
प्रतिनिधी मुंबई, दि. ३१ : राज्य सेवा मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ पर्यायांऐवजी वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे, या निर्णयामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची शक्यता असून मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय २०२५ च्या मुख्य परीक्षेपर्यंत पुढे ढकलावा, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे केली आहे. […]
महाराष्ट्र भूषण पुरस्कार आता २५ लाख रुपयांचा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय
प्रतिनिधी मुंबई, दि. ३१: – महाराष्ट्र शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सन्मानदर्शक महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम दहा लाखांवरून २५ लाख रुपये करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. तसेच हा पुरस्कार नव्या स्वरुपात, आणखी दिमाखदार ठरावा यासाठी प्रय़त्न व्हावेत असा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळ बैठकीनंतर महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या अनुषंगाने बैठक झाली. बैठकीस उपमुख्यमंत्री […]
वाघळवाडी( कन्नड वस्ती ) येथे अवैद्यरित्या दारू विक्री करणाऱ्या वरती गुन्हा दाखल.
प्रतिनिधी- फिरोज भालदार बारामती तालुक्यातील वाघळवाडी गावचे हद्दीत कन्नड वस्ती येथे दि. 30- 1- 2023 रोजी 2. 40 वा चे सुमारास सोमेश्वर कारखाना ते वाणेवाडी रोडच्या कडेला झाडाच्या अडोशाला आरोपी संगीता खन्ना गागडे रा. कन्नड वस्ती वाघळवाडी, ता. बारामती जि. पुणे हे आपल्या पशी बेकायदेशीर बिगर परवाना गावठी हातभट्टी एक पांढऱ्या रंगाचे 10 लिटर मापाचे […]
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीकरीता ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
प्रतिनिधी राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीकरिता शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी – २०२२ परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात आले आहेत. या परीक्षेचे माध्यम, अभ्यासक्रम, पात्रता, अर्ज करण्याची कार्यपद्धती व कालावधी याबाबतची अधिसूचना परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध […]
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे
प्रतिनिधी महाराष्ट्र राज्यातील दोन पदवीधर आणि तीन शिक्षक अशा पाच मतदारसंघात आज शांततेते मतदान झाले असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली. नाशिक, अमरावती पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. नाशिक विभागात ४९.२८ टक्के, अमरावती विभागात ४९.६७ टक्के, औरंगाबाद विभागात ८६ टक्के, नागपूर विभागात ८६.२३ […]
वडगाव निंबाळकर स्वातंत्र्य विद्या मंदिर प्रशालेच्या विद्यार्थिनींचा रिले स्पर्ध्येत राज्यस्तरावर प्रथम क्रमांक
प्रतिनिधी- फिरोज भालदार क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तर शालेय मैदानी स्पर्धा २२२२ – २३ हे दि-२९ ते ३१ जानेवारी शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे- बालेवाडी , पुणे या ठिकाणी सुरू असून या स्पर्धेत सोमवार दि. ३० जानेवारी २०२३ रोजी बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर मधील स्वातंत्र्य विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयच्या विद्यार्थिनींनी […]
पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत खाते उघडण्याची सुविधा
प्रतिनिधी पुणे दि. ३०: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना त्यांचे बँक खाते उघडण्यासह आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा आता त्यांच्या गावातील पोस्ट मास्टर यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे असून या सुविधेचा लाभ घ्यावा असे, आवाहन कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विकास पाटील यांनी केले आहे. केंद्र शासनातर्फे प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजने अंतर्गत […]