तुकाराम महाराजांच्या पालखीत विद्या प्रतिष्ठानचा सायबर जयघोष

Uncategorized

प्रतिनिधी.

बारामती: विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात वारकर्‍यांबरोबर सायबर सुरक्षित दिंडीद्वारे सायबर जनजागृतीचे काम केले.

विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय, बारामती आणि क्विक हील फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर सुरक्षित दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. संत तुकाराम महाराजांच्या दिंडीत विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांमध्ये सायबर जागरूकता निर्माण करण्यासाठी कीर्तन उपक्रम राबवले. दैनंदिन जीवनात होणाऱ्या सायबर समस्यांवर उपाय कसे करावेत आणि काय करू नये याबद्दल विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांना कीर्तनातून मार्गदर्शन केले. या उपक्रमात विद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.

ही सायबर सुरक्षित दिंडी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीबरोबर बारामतीत आली. या उपक्रमादरम्यान वारकऱ्यांनी सायबर सुरक्षिततेबद्दल महत्त्वाची माहिती जाणून घेतली आणि सायबर घोटाळ्यांपासून कसे सुरक्षित राहावे हे शिकले.
सदर दिंडीसाठी विशाल जाधव सामाजिक कार्यकर्ते यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
दिंडीसाठी सलमा शेख, शिक्षक समनव्यक, क्विक हील फाऊंडेशनचे क्लब मेंबर आणि विद्यार्थी यांनी नियोजन केले.

या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे, उपप्राचार्य डॉ. श्यामराव घाडगे, उपप्राचार्य डॉ. लालासाहेब काशीद, बी.बी.ए (सी.ए.) विभाग प्रमुख महेश पवार, बी.एस.सी. (संगणक शास्त्र) विभाग प्रमुख गजानन जोशी, बीसीए (सायन्स) विभाग प्रमुख किशोर ढाणे, गौतम कुदळे, जगदीश सांगवीकर यांचे मार्गदर्शन लाभले.