प्रतिनिधी
निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा २६ जाने. २०२६रोजी संपन्न झाला.सकाळी ७.४५ वा.मा.ॲड. आदेशजी गिरमे यांच्या शुभहस्ते विद्यालयाचे ध्वजारोहण झाले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ .दिपाली ननावरे यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले व आपल्या प्रास्ताविकामध्ये भारतीय प्रजासत्ताक दिनाबद्दल माहिती सांगून विद्यालयांमध्ये राबवले जाणारे विविध उपक्रम याविषयी माहिती दिली. यावेळी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. ॲड . आदेशजी गिरमे यांच्या शुभहस्ते पार पडला.यामध्ये एस.एस.सी. परीक्षा मार्च २०२५ मध्ये विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवलेली विद्यार्थिनी कु. सानिका लालासो बनसोडे या विद्यार्थिनीस ज्येष्ठ पत्रकार मा. श्री.दत्ता माळशिकारे यांच्या वतीने देण्यात येणारे बक्षीस प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते देण्यात आले. तसेच विद्यालयात घेण्यात येणाऱ्या विविध सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचे ट्रॉफी, मेडल व प्रशस्तीपत्रक देऊन संस्थेचे अध्यक्ष मा. श्री.सतीशभैया काकडे दे. उपाध्यक्षा सौ.सुप्रियाताई पाटील, ज्येष्ठ संचालक मा. श्री.भीमराव बनसोडे सर मानद सचिव मा.श्री.मदनराव काकडे दे. यांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले.
सायंकाळी ६.००वा.विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शनाचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योजक मा.श्री.आर.एन.शिंदे बापू तसेच मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.देविदास वायदंडे यांच्या शुभहस्ते आणि अध्यक्ष मा. श्री.सतीशभैय्या काकडे दे. उपाध्यक्षा सौ.सुप्रियाताई पाटील, ज्येष्ठ संचालक मा. श्री.भीमराव बनसोडे सर, मानद सचिव मा.श्री.मदनराव काकडे दे.संस्थेच्या संचालिका सौ.सविताताई काकडे दे.आणि मा.ॲड.श्री.आदेशजी गिरमे यांच्या उपस्थितीत पार पडले. तसेच यावेळी विद्यालयाच्या शकुंतला माई लेझीम पथकाने नेत्रदिपक लेझीम सादर करून पाहुण्यांची मने जिंकली.
यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दोन तासांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. यामध्ये सत्यम शिवम सुंदरम,शारदा स्तवन,वेगवेगळ्या राज्यांची परंपरा जपणाऱ्या गीतांवर नृत्य, बातम्या, शिवाजी महाराजांचा पाळणा, आदिवासी नृत्य, लोकनृत्य,देशभक्तीपर गीतांवर नृत्ये सादर केली. तसेच पालकत्व,मुलांच्या अपेक्षा आणि निकालाचा थरार यांवर भाष्य करणारे महाराष्ट्राची हास्य जत्रा हे विनोदी नाटक सादर केले.
यावेळी गावातील ग्रामस्थ,पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहसंमेलन प्रमुख श्री.राजेंद्र खुडे यांनी केले तर आभार क्रीडा प्रमुख श्री.पोपट कोळेकर यांनी मानले.

















