• Home
  • ताज्या बातम्या
  • शिवजयंतीचे औचित्य साधून जि.प.प्राथमिक शाळा शेंडकरवाङी येथील वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले.
Image

शिवजयंतीचे औचित्य साधून जि.प.प्राथमिक शाळा शेंडकरवाङी येथील वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले.

प्रतिनिधी.
छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी मुलांनी हिंदी मराठी आशा विविध गाण्यावर आपले नृत्य सादर केले. मुला,मुलींनी सुंदर आशी वेशभूषा केली होती.
दरवर्षी नृत्यदिग्दर्शक, कोरीओग्राफर बाहेरील आसायचे परंतु यावर्षी शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्वतः नृत्यदिग्दर्शकाची भूमिका बजावून मनाला भावणारी मन पसंद गीते बसवली होती.
तसेच रांगोळी स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते.विजेत्या स्पर्धकांना ऋषिकेश जालिंदर शेंडकर व युवा नेते लोकेश कैलास शेंडकर यांनी आकर्षक बक्षीस देऊन मुला, मुली॔ना गौरविण्यात आले.
स्नेहसंमेलनाला शेंङकरवाङी ग्रामस्थ युवक महिला भगिनींनी बहूसंख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला.
तसेच प्रोत्साहन बक्षिसांची खैरात केली.प्रतेक गाण्याला बक्षीस रूपी ग्रामस्थ,युवक,महिला भगिनी यांनी इनाम दिला.
एक आदर्श घ्यावा,शाळेतील मुलांचा हेवा वाटावा आसा कार्यक्रम सादर केल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब फङतरे,सहशिक्षिका स्नेहल फङतरे, अंगणवाडी सेविका रेश्मा शेंडकर,मिनाक्षी बङेकर यांचा सन्मान करण्यात आला.
माध्यमिक विद्यालय सोरटेवाङीचे शिक्षक बाबुलाल पङवळ सर यांनी हास्य विनोद करून अप्रतिम सूत्रसंचलन केले.
कार्यक्रमाला सुंदर साऊंङ सिस्टीम तसेच लाईट ङेकोरेशन अजित कोळपे यांचे लाभले.
यावेळी करंजेपूल गावचे मा.सरपंच वैभव गायकवाड,करंजे सोसायटी चेअरमन महेंद्र शेंडकर, शिवाजीराव शेंङकर,ग्रामपंचायत सदस्य निखील शेंडकर,सदस्या सोनल गायकवाड,राहूल निवृत्ती शेंडकर,रामचंद्र शेंडकर,तंटामुक्ती अध्यक्ष मयुर शेंडकर, करंजे सोसायटी व्हाचेअरमन मच्छिंद्र शेंडकर,यात्रा कमिटी अध्यक्ष बाबू शेंङकर, श्रीकांत शेंडकर,लोकेश शेंडकर, ऋषिकेश शेंडकर , समिर शेंडकर ,सोमप्रसाद शेंडकर,अभिषेक शेंडकर,दिनेश शेंडकर सर्वानी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.
उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक बाळासाहेब फङतरे व बाबुलाल पङवळ सर यांनी मानले.

Releated Posts

जल संवर्धनाच्या दिशेने संत निरंकारी मिशनचा सशक्त उपक्रम: ‘प्रोजेक्ट अमृत’चा चौथा टप्पा

प्रतिनिधी. इद्रायणी  नदी संवर्धनासाठी देहू–आळंदी–चऱ्होली येथे भव्य स्वच्छता अभियान आळंदी , १९ फेब्रुवारी २०२६ : जेव्हा सेवा हीच…

ByBymnewsmarathi Feb 20, 2026

बारामती! दिवंगत अजितदादा पवार यांच्या निधनानंतर बारामती तालुक्यातील मुस्लिम समाजाकडून रमजान ईद हा सण साध्या पद्धतीने साजरा करणार असल्याचा निर्णय.

प्रतिनिधी – मुस्लिम समाजाचा पवित्र महिना म्हणजे रमजान महिना ओळखला जातो हा रमजान महिना दिनांक १९ फेब्रुवारी २०२६…

ByBymnewsmarathi Feb 20, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी…

प्रतिनिधी. निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयात१९ फेब्रुवारी२०२६ रोजी सकाळी८.००वा. शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी…

ByBymnewsmarathi Feb 19, 2026

 श्री सोमेश्वर मंदिर येथे महाशिवरात्री तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

प्रतिनिधी. श्री सोमेश्वर सेवाभावी संस्था,सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट,ग्रामपंचायत करंजे,आजी माजी सैनिक संघटना,पत्रकार संघ यांच्या संयुक्त विध्यमाने आयोजित या उपक्रमास…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026