मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Monday, 28 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 29 April 2026 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

फार्मर आयडी नोंदणी करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
April 29, 2026 1 मिनिट वाचन 8,533 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी.

पुणे, दि.२९ : कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला असून अद्यापही ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडीची नोंदणी केली नाही त्यांनी २० मे २०२६ पूर्वी नोंदणी करावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

राज्यात ॲग्रीस्टॅक योजनेची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. राज्यामध्ये एकूण १.७१ कोटी खातेदार असून यापैकी १.३२ कोटी शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेले आहेत. फार्मर आयडी नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या नजिकच्या सेवा सुविधा केंद्रावर किंवा स्वतःही ॲग्रीस्टॅक पोर्टलवरून ऑनलाइन नोंदणी करावी.

फार्मर आयडी नोंदणी संदर्भात कोणतीही अडचण असल्यास पुणे विभागातील शेतकऱ्यांनी सहायक कृषी अधिकारी श्रीमती संगीता ननावरे यांच्याशी ७५८८५०९४९२ या क्रमांकावर संपर्क साधावा.
0000

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख