मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Monday, 28 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 03 May 2026 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

प्राइड ऑफ महाराष्ट्र पुरस्काराने कृष्णमुर्ती जगताप सन्मानित

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
May 3, 2026 1 मिनिट वाचन 8,537 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी.

बारामती- महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् च्यावतीने देण्यात येणारा “प्राइड ऑफ महाराष्ट्र-पत्रकार” पुरस्कार दैनिक संध्याचे बारामती तालुका प्रतिनिधी कृष्णमुर्ती जगताप यांना देण्यात आला.महाराष्ट्र दिन/कामगार दिन व मराठी राजभाषा दिनानिमित्त सामाजिक,सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा प्राइड ऑफ महाराष्ट्र पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.त्यामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे उपमुख्यमंत्री वैद्यकिय मदत कक्ष बारामती शहर कक्षप्रमुख, दैनिक संध्या/संध्या लाईव्ह/MCN न्युज मराठी चे बारामती तालुका प्रतिनिधी,पत्रकार श्री.कृष्णमुर्ती पांडुरंग जगताप यांना प्राइड ऑफ महाराष्ट्र – पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी तृप्ती देसाई (संस्थापक अध्यक्षा-भुमाता ब्रिगेड,महाराष्ट्र राज्य),प्रा.दत्तात्रय कोबाराने,सत्यवान लांडगे,आदम सय्यद यांच्या शुभहस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, सांस्कृतिक कला रंगमंदीर,एयरपोर्ट रोड,पुणे येथे कार्यक्रम सोहळ्यात प्रदान करण्यात आला.यावेळी मान्यवरांसह माजी सैनिक,पोलीस अधिकारी व महिलावर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.त्यांचे वैद्यकिय,सामाजिक,शैक्षणिक व पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय योगदान असल्यामुळे हा पुरस्कार प्रदान करण्यात आल्यामुळे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख