मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Friday, 9 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
ताज्या बातम्या

बारामती तालुक्यात गोवंश कत्तलीचा पर्दाफाश; रक्तमिश्रित साहित्य जप्त

mnewsmarathi 20 May 2026 1 मिनिट वाचन 10,025 वाचन

प्रतिनिधी.

माळेगाव पोलीस स्टेशन हद्दीत गोवंश जनावरांच्या अवैध कत्तलीप्रकरणी तीन जणांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या कारवाईमुळे बारामती परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 238, 325, 3(5) तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 अंतर्गत गुन्हा क्रमांक 121/2026 नोंद करण्यात आला आहे.
या प्रकरणी फिर्यादी म्हणून वैभव सुनिल थोरात गोरक्षक यांनी तक्रार दाखल केली आहे. आरोपींमध्ये 1) बिलाल कुरेशी (पूर्ण नाव माहिती नाही), 2) अक्षय उर्फ बबलू विजय बागाव रा. मेडद, ता. बारामती आणि 3) बापू कोंडीबा ठोंबरे रा. मेडद, ता. बारामती यांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 मे 2026 रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मौजे नेपतवळण येथील एका पत्राशेडमध्ये गोवंश जनावरांची अवैध कत्तल सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली असता, आरोपी अक्षय बागाव याने त्याच्या मालकीच्या शेडमध्ये कथितरित्या कत्तलीसाठी जागा उपलब्ध करून दिल्याचे समोर आले. तसेच आरोपी बापू ठोंबरे हा रक्ताचे डाग साफ करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करताना आढळून आला.
घटनास्थळाबाहेर तीन खिलार जातीच्या देशी गायी अत्यंत कुपोषित अवस्थेत, चारा-पाण्याविना दोरखंडाने बांधलेल्या स्थितीत मिळून आल्या. पोलिसांनी शेडमधून रक्तमिश्रित मांसाचा तुकडा, चाकू, लोखंडी हुक, रक्ताचे डाग असलेले दोर, रक्तमिश्रित पाणी आणि इतर साहित्य जप्त केले. जप्त मालाची एकूण किंमत 55 हजार 400 रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणाचा पुढील तपास मोहोळे करत असून, प्रभारी अधिकारी म्हणून निलेश माने कार्यरत आहेत. पोलिसांनी आरोपींचा पूर्व इतिहास नसल्याचे स्पष्ट केले असून, प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे

लेखक

mnewsmarathi

M News Marathi