• Home
  • ताज्या बातम्या
  • बारामती! गायीला राष्ट्रीय पशू घोषित करावे : बारामती मुस्लिम समाजाची मागणी
Image

बारामती! गायीला राष्ट्रीय पशू घोषित करावे : बारामती मुस्लिम समाजाची मागणी

प्रतिनिधी –

बारामती मुस्लिम समाजाच्या वतीने दिनांक २५ मे रोजी प्रांताधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) तसेच बारामती शहर पोलीस निरीक्षक यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

सदर निवेदनामध्ये महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या गोहत्या बंदी, गोतस्करी प्रतिबंध व गोसंरक्षण संदर्भातील कायद्यांना बारामतीतील मुस्लिम समाजाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच आमच्या हिंदू समाज बांधवांच्या आस्थेचा व श्रद्धेचा विषय असलेल्या गोमातेला “राष्ट्रीय पशू” घोषित करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी शेतकरी व पशुपालकांच्या अडचणी लक्षात घेऊन निरुपयोगी व पालन अशक्य झालेल्या गायींसाठी आर्थिक मोबदला देणे, गोपालनासाठी प्रतिदिन अनुदान सुरू करणे, गोशाळांची संपूर्ण जबाबदारी शासनाने स्वीकारणे, तसेच गोसंरक्षणाच्या नावाखाली कायदा हातात घेणाऱ्या व मॉब लिंचिंग करणाऱ्या प्रवृत्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

गोवंश संरक्षणासोबतच कायदा सुव्यवस्था, सामाजिक सलोखा आणि संविधानिक मूल्ये जपली जावीत, अशी भूमिका यावेळी बारामती मुस्लिम समाजाच्या वतीने मांडण्यात आली.

यावेळी मुनीर तांबोळी, अजिज सय्यद, पीर मोहम्मद शेख, कासम कुरेशी, एजाज शेख ,सलमान शेख, रियाज सय्यद, लतीफ शेख , मोइन बागवान, फैयाज शेख , मन्सूर शेख, आक्रम बागवान, इब्राहिम बागवान, आरिफ मुजावर, अर्सलान बागवान, आसिफ शेख, दस्तगीर शेख , अजहर शेख , तालीब कुरेशी, खाजा कुरेशी, ए के कुरेशी, रियाज शेख,वसीम कुरेशी ,कलीम कुरेशी, बसपा पार्टीचे जेष्ठ नेते काळुरामजी चौधरी ,
विजय जगताप बीएसपी जिल्हा उपाध्यक्ष, संजय सदाशिव वाघमारे आरपीआय तालुकाध्यक्ष बारामती. सामाजिक कार्यकर्ते चिऊशेठ जंजिरे
अफरोज मुजावर, तोसीफ बागवान, चिऊ – शेठ जंजिरे , जैद बागवान ,मुन्नाभाई बागवान (फुल अँड फायनल) , आय्याज शेख , पत्रकार तैनुर शेख, मन्सूर शेख, मोईन बागवान, मोहसीन शेख व तसेच इतर मुस्लिम बांधव यावेळी उपस्थित होते.

Releated Posts

बारामती! वडगाव निंबाळकर बंगला झोपडपट्टी येथे सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीच्या खोलीकरणाचे काम संत गतीने चालू? ; मात्र ग्रामपंचायत प्रशासनाचे यावरती दुर्लक्ष.

प्रतिनिधी- फिरोज भालदार वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत प्रशासनाकडून बंगला झोपडपट्टी येथील सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीच्या खोलीकरणाचे काम चालू झाले आहे…

ByBymnewsmarathi Jul 8, 2026

श्री संत सोपानकाका महाराज पालखी सोहळा ; वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील वाहतुकीत बदल.

प्रतिनिधी – मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, पुणे यांनी मोटार वाहन कायदा, १९८८ चे कलम ११५ तसेच शासन गृह…

ByBymnewsmarathi Jul 8, 2026

अश्लील मेसेज, ब्लॅकमेल आणि फेक इन्स्टाग्राम; कारंजे येथील युवकांवर पॉक्सोसह गंभीर गुन्हा दाखल.

वडगाव निंबाळकर, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात एका युवकाविरुद्ध सोशल मीडियाचा गैरवापर करून महिलेचा बनावट इन्स्टाग्राम आयडी तयार करणे,…

ByBymnewsmarathi Jul 7, 2026

आळंदीतील चारही पूल पाण्याखाली; वारकऱ्यांना आहे त्या ठिकाणीच थांबण्याचे प्रशासनाचे आवाहन

​सहसंपादक- अक्षय थोरात आषाढी वारी २०२६ – श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीव​मुख्​मुख्यमंत्र्यांच्या आणि प्रशासनाच्या वतीने…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026