मुख्य मजकुरावर जा
Friday, 11 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 09 June 2026 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

माळेगाव पोलिसांची दमदार कामगिरी: गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह दोन आरोपींना अटक

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
June 9, 2026 1 मिनिट वाचन 8,518 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

​ पुणे ग्रामीणच्या माळेगाव पोलीस स्टेशनने एक मोहीम राबवून जिल्ह्यातील गुन्हेगारी कृत्यांवर मोठा प्रहार केला आहे. माळेगाव पोलीस पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एक गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस आणि धारदार कुकरी जप्त करून दोन आरोपींना तत्काळ अटक केली आहे.

माळेगाव पोलीस स्टेशनच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, माळेगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी स.पो.नि. कुलदीप संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. ८ जून २०२६ रोजी रात्री माळेगाव-कहावगज रोडवर पोलीस गस्त घालत होते. यावेळी पोलिसांचे लक्ष ‘एमएच-४२-एएक्स ४४२८’ या ‘निओस ग्रँड’ गाडीकडे गेले.
​पोलीस पथकाने गाडी अडवून त्यातील इसमाची झडती घेतली. त्याचे नाव गणेश तात्याराम गावडे (वय २०, रा. कहावगज) असे समोर आले. त्याच्या कमरेला एक गावठी पिस्तूल व मॅगझिनमध्ये एक जिवंत काडतूस आढळले. तसेच, गाडीच्या ड्रायव्हर सीटखाली एक धारदार कुकरी चाकूही मिळून आला.

पोलीस पथकाने एकूण ३,३०,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, ज्यामध्ये:
१. ३०,००० रुपयांचे गावठी पिस्तूल.
२. ३०० रुपयांचे जिवंत काडतूस.
३. ५०० रुपयांची कुकरी.
४. ३,००,००० रुपयांची ह्युंदाई निओस ग्रँड गाडी.

गणेश गावडे याने हे हत्यार मयूर विष्णू मोरे (रा. मेढद) याच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिली आहे. त्याला ही हत्यारे कशासाठी हवी होती आणि आणखी कोणाला ही हत्यारे पुरवली होती का, याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
​माळेगाव पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. १५०/२०२६, शस्त्र अधिनियम कलम ३, ४, ५, २५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१), (३), १३५ अन्वये गुन्हा दाखल करून गणेश गावडे आणि मयूर मोरे यांना अटक केली आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उप-विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. माळेगाव पोलीस स्टेशनचे स.पो.नि. कुलदीप संकपाळ, देविदास साळवे, राहुल पांढरे, विजय वाघमोडे, ज्ञानेश्वर सानप, अमोल राऊत, ज्ञानेश्वर मोरे, अमोल वाघमारे आणि जयसिंग कचरे यांच्या पथकाने ही महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. प्रतिनिधी अक्षय थोरात बारामती माळेगांव

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख