• Home
  • ताज्या बातम्या
  • तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईनंतर मंत्री नरहरी झिरवाळही मैदानात; नाशिक दूध बाजारात अचानक तपासणी
Image

तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईनंतर मंत्री नरहरी झिरवाळही मैदानात; नाशिक दूध बाजारात अचानक तपासणी

उपसंपादक- अक्षय थोरात

अन्न व औषध प्रशासन आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर संपूर्ण राज्यात भेसळखोरी आणि गुटख्याविरोधात धडाकेबाज कारवाई सुरू झाली. मुंढे यांच्या कारवाईच्या धडाक्याने राज्याचे अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनाही अखेरीस रस्त्यावर उतरावे लागले.
शुक्रवारी त्यांनी नाशिक शहरातील दूध बाजारात अकस्मात भेट देऊन विक्री होणाऱ्या दुधाचे नमुने संकलित केले.

तुकाराम मुंढे यांची अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी नेमणूक झाल्यापासून राज्यात गुटखा विक्रेते, अन्न पदार्थातील भेसळखोरांवर कारवाईचे सत्र सुरू आहे. मुंबई, पुणे, कोकण, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आदी ठिकाणी हलक्या दर्जाच्या, खाण्यास असुरक्षित अस्वच्छ उत्पादन प्रक्रिया केलेले पदार्थ व पॅकिंगवर कारवाई करण्यात आली. त्या अंतर्गत कोट्यवधी रुपयांचे सुपारी, खाद्यतेल, पिण्याचे पाणी, दूध, दुग्धजन्य पदार्थ, खवा, पेढा, तुूप, गुळ आदी अन्न पदार्थ आणि भेसळीसाठी वापरलेले घटक जप्त करण्यात आले. केवळ सणोत्सवात चर्चेत राहणारा अन्न व औषध प्रशासन विभाग मुंढे यांच्या कारवाईच्या धडाक्याने एकदम प्रकाशझोतात आला. या खात्याचे मंत्री नरहरी झिरवाळ हे सुद्धा आता भेसळीविरोधात मैदानात उतरले.

शुक्रवारी सकाळी मंत्री झिरवाळ यांनी शहरातील दूध बाजारात अकस्मात भेट दिली. नाशिकमधील दुधाची ही मुख्य बाजारपेठ आहे. यावेळी अन्न औषध प्रशासन व दुग्ध विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मंत्री झिरवाळ यांच्या उपस्थितीत परिसरातील विक्रेत्यांकडील दुधाचे नमुने संकलित करण्यात आले. पथकाकडे दुधाची नऊ निकषांनुसार तात्काळ पडताळणीची उपकरणे होती. मंत्री झिरवाळ व पथकाने दूध व दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता, शुद्धता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी नमुन्यांची जागेवरच प्राथमिक तपासणी केली. ग्राहकांना भेसळमुक्त व दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत तसेच अन्न सुरक्षा मानकांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी शासन आग्रही आहे. जनतेच्या आरोग्याशी संबंधित कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असे मंत्री झिरवाळ यांनी सूचित केले. दरम्यान, मंत्री झिरवाळ यांनी केलेल्या या तपासणीनंतर समाजमाध्यमातून इतके दिवस काय करत होते, आजपर्यंत का केले नाही, असे प्रश्न विचारले जात आहेत. तुकाराम मुंढे यांचे काम आणि जनतेचा दबाव म्हणून तुम्हाला रस्त्यावर उतरावे लागले, याकडे नागरिकांकडून लक्ष वेधले जात आहे.
दुधाची आता नियमित तपासणी

शुक्रवारी दूध बाजारात घेतलेल्या नमुन्यात सर्व अहवाल नकारात्मक आढळून आले. आजमितिस दुधात काही भेसळ आढळली नाही. दूध भेसळ तपासणीची अशी कारवाई मुंबई व अहिल्यानगरमध्ये सुरू होती. नाशिकमध्ये आता सुरू करण्यात आली असून ती नियमितपणे होईल. दूध विक्रेत्यांशी चर्चेतून सकाळी बाजारात साधारणत: प्रतिदिन चार हजार लिटर दूध आल्याची माहिती मिळाली. दैनंदिन आवकेवर लक्ष दिले जाईल. कारण एक दिवस गाय, म्हैस जास्त आणि एक दिवस कमी दूध देते का, याचाही अंदाज लागतो. अन्न सुरक्षा व ग्राहक संरक्षणासाठी अशा तपासणी मोहिमा राज्यभर सातत्याने राबविण्यात येतील. असे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

Releated Posts

श्री.बा.सा. काकडे दे. विद्यालय निंबुत मध्ये योग दिन उत्साहात साजरा…

निंबुत येथील श्री. बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयात दि. २१ जून वार रविवार रोजी स. ७.०० वा. आंतरराष्ट्रीय…

ByBymnewsmarathi Jun 21, 2026

निरोगी शरीर, निर्मळ मन आणि सजग आत्मा’ या संदेशासह संत निरंकारी मिशनचा आंतरराष्ट्रीय योग दिवस

भोसरी , 19 जून 2026:- ‘निरोगी शरीर, निर्मळ मन आणि सजग आत्मा’ या पवित्र संकल्पाला प्रत्यक्षात साकार करत…

ByBymnewsmarathi Jun 19, 2026

शाळकरी मुलांच्या सुरक्षेला प्राधान्य: संशयास्पद कँडी किंवा खाद्यपदार्थांपासून सावध राहा

उप संपादक- अक्षय थोरात सोशल मीडियावर “स्ट्रॉबेरी क्विक” किंवा कँडीसारखे दिसणारे अमली पदार्थ शाळांमध्ये वाटले जात असल्याचे विविध…

ByBymnewsmarathi Jun 19, 2026

आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसमवेत वाढदिवस साजरा करत पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे यांनी दिला सामाजिक संदेश

प्रतिनिधी. बारामती : आजच्या काळात वाढदिवस मोठ्या गाजावाजात, खर्चिक पद्धतीने साजरे करण्याची प्रथा वाढत असताना करंजे पूल दूरक्षेत्राचे…

ByBymnewsmarathi Jun 17, 2026