मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Monday, 28 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 19 June 2026 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

सतीश भैया कल्याणकारी संघाच्या वतीने जेष्ठ नागरिक व बारा वर्षे पुढील मुली व महिलांसाठी एसटी बसचा पास काढणे शिबिर आयोजन.

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
June 19, 2026 1 मिनिट वाचन 8,538 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी

 बारामती. निंबुत येथे सतीश भैय्या कल्याणकारी संघ यांच्या वतीने निंबुत गावातील बारा वर्षावरील मुली, व महिलांसाठी एसटी बसच्या तिकिटामध्ये सवलत मिळण्याकरिता लागणारा पास बाबा कमल सभागृहनिंबुत येथे आज रोजी सायंकाळी सहा वाजता सुरू करण्यात आला.

 कल्याणकारी संघाच्या वतीने अगदी माफक दरामध्ये म्हणजे शंभर रुपयांमध्ये हा पास काढून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे पास काढण्यासाठी पुढील दोन दिवस ही यंत्रणा गावामध्ये असणार आहे. गरजवंतांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन संघाचे अध्यक्ष श्री सतीश राव काकडे यांनी केले आहे

 बाहेर हे कार्ड काढण्यासाठी जवळपास 200 ते 250रुपये खर्च येतो मात्र राहिलेले दीडशे रुपये सोमेश्वर चे संचालक श्री अभिजीत राव काकडे यांनी स्वतः उपलब्ध करून दिले. या कार्यक्रमासाठी कल्याणकारी संघाचे सचिव मदनराव काकडे, विक्रम काकडे, अमोल काकडे, मधुकर बनसोडे, योगीराज काकडे, भरत काकडे रुपेश काकडे, जुमन सय्यद, विकास जाधव, विजय पवार वैभव जाधव, धनंजय काकडे, गणेश फरांदे, राजू काळे,विशेष परिश्रम घेतले. यावेळी आलेल्या महिलांनी व ग्रामस्थांनी कल्याणकारी संघाचे अध्यक्ष सतीश  काकडे व सोमेश्वर चे संचालक अभिजीत  काकडे यांचे आभार मानले

 बारामती तालुक्यामध्ये कदाचित शंभर रुपयांमध्ये कार्ड काढून देणारे निंबूत हे पहिलेच गाव असावे अशा भावना महिलांनी व्यक्त केल्या.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख