मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Monday, 28 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 21 June 2026 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

श्री.बा.सा. काकडे दे. विद्यालय निंबुत मध्ये योग दिन उत्साहात साजरा…

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
June 21, 2026 1 मिनिट वाचन 8,540 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

निंबुत येथील श्री. बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयात दि. २१ जून वार रविवार रोजी स. ७.०० वा. आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. दिपाली ननावरे यांनी योगा विषयी माहिती सांगून योगाप्रकार करून घेतले. यामध्ये ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन,भुजंगासन, चक्रासन तसेच प्राणायाम चे विविध प्रकार करून घेतले.
योग दिनास विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र होळ येथील, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. रणवीर प्रेमजीत, आरोग्य सेवक श्री.दत्तात्रेय फरांदे व पूजा कदम तसेच आशा सेविका कल्पना फरांदे, रूपाली सोनवणे, रूपाली फरांदे,धनश्री बनसोडे उपस्थित राहून यांनी देखील योगाचे विविध प्रकार केले.
योग दिन कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. सतीशभैय्या काकडे दे. उपाध्यक्षा, मा.सौ. सुप्रियाताई पाटील, मानद सचिव मा.श्री.मदनराव काकडे दे. व ज्येष्ठ संचालक मा.श्री. भीमराव बनसोडे सर यांनी शुभेच्छा दिल्या.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख