मुख्य मजकुरावर जा
Tuesday, 15 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 15 September 2026 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

विश्रांतवाडी पोलिस ठाण्या हद्दीतील दोन सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
September 15, 2026 1 मिनिट वाचन 3,501 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी

विश्रांतवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजवणाऱ्या आणि हिंसक कारवायांमध्ये सक्रिय असणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना पुणे शहर व संपूर्ण पुणे जिल्हा हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. विश्रांतवाडी पोलिसांनी केलेली ही कारवाई परिसरातील गुन्हेगारीला मोठा आळा घालणारी ठरली आहे.

​तडीपार करण्यात आलेले गुन्हेगार:

​१. नवीन उर्फ बच्चू मनोज वडावराव (वय २६, रा. सर्व्ह नं. ११०/१९९, शांतीनगर, येरवडा, पुणे)

२. दिरेन लक्ष्मण वाघेला (वय २३, रा. मेटल कॉटर्स रूम नं. १४२, गणेश मंदिराजवळ, येरवडा, पुणे)

​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही गुन्हेगारांचे पोलिस रेकॉर्ड तपासले असता ते हिंसक आणि खूनी प्रवृत्तीचे असल्याचे समोर आले आहे. त्यांच्याविरोधात गंभीर स्वरूपाचे शरीरविरुद्धाचे गुन्हे दाखल आहेत. ते स्वतःजवळ घातक शस्त्र बाळगून, आपल्या ३ ते ४ साथीदारांना सोबत घेऊन दिवस व रात्रीच्या वेळी विश्रांतवाडी पोलिस ठाणे हद्दीत आणि आसपासच्या परिसरात फिरत असत. व्यापारी वर्ग, नोकरदार वर्ग तसेच इतर शांतताप्रिय नागरिकांना शस्त्राचा धाक दाखवून शिवीगाळ करणे व तोडफोड करून परिसरात दहशत निर्माण करत होते. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

​या दोन्ही गुन्हेगारांवर अनेक गंभीर गुन्हे दाखल असूनही त्यांच्या वर्तनात कोणतीही सुधारणा झालेली नव्हती. त्यांची गुन्हेगारी प्रवृत्ती पाहता भविष्यात ते पुन्हा गंभीर अपराध किंवा हिंसा घडवून आणू शकतात, या पार्श्वभूमीवर त्यांना या क्षेत्रातून दूर ठेवण्यासाठी पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ – ४ यांच्याकडे तडीपारचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

​या प्रस्तावानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करत पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ – ४ यांनी, पुणे शहर आयुक्तालय, पिंपरी चिंचवड आयुक्तालय आणि संपूर्ण पुणे जिल्हा हद्दीतून दि. १२/०९/२०२६ पासून २ वर्षांच्या कालावधीसाठी तडीपार करण्याचे आदेश पारित केले आहेत.

​सदरची उल्लेखनीय कामगिरी अप्पर पोलिस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) मनोज पाटील, पोलिस उप-आयुक्त (परिमंडळ-४) आणि सहायक पोलिस आयुक्त (येरवडा विभाग) सुनील जेतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली; विश्रांतवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, सर्व्हलन्स पथकाचे सहायक पोलिस फौजदार मनोज शिंदे, सुनील हसबे आणि महिला पोलिस शिपाई विद्या पानसरे यांनी केली आहे.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख